मुंबई भाजपच्या वतीने आंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ उत्साहात साजरा
21-Jun-2023
Total Views | 33
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई भाजपाच्या वतीने मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात शहरासह उपनगरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वांद्रे-रेक्लेमेशन प्रोमोनाड येथील योग गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले.
मुलुंड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खा. मनोज कोटक सहभागी झाले. खा. पूनम महाजन यांनी योगासने केली. आ. सुनील राणे यांनी बोरिवली पश्चिम येथील शिंपोली रोडवरील मधुरम हॉलमध्ये योगाभ्यास केला. कांदिवली पूर्व येथे आ. अतुल भातखळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत योगासने केली. विलेपार्ले येथे आ. पराग अळवणी, माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. पराग शाह ९० फिट रोड येथील आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
दहिसर येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आ. मनीषाताई चौधरी यांच्या पुढाकाराने योगाभ्यास कार्यक्रम घेण्यात आला. आ. कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या प्रयत्नाने बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड, सरदार नगर येथे योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. कांदिवली पश्चिम विधानसभा, प्रभाग क्र. ३१, एकता नगर येथील महिला आधार केंद्रात योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. मुंबई भाजयुमो अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांनी मालाड येथे स्थानिक नागरिकांच्या बरोबर योगासने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केलेल्या विकास कामांची माहिती देणारे फलक लावण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात ओंकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने करण्यात आली. यामध्ये सहभागी नागरिकांनी उभ्या, बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार घेण्यात आले.