कोमसाप मालवणचा अनोखा उपक्रम; मधू मंगेश कर्णिक यांनी केले विशेष कौतुक

    02-Jun-2023
Total Views | 70

madhu mangesh komsap malvan 
 
मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद कोकण साहित्याच्या संवर्धनासाठी नेहमीच तत्पर असते. नुकताच कोमसाप मालवण आयोजित 'माझे आजोळ, माझी देवभूमी' हा अनोखा उपक्रम राबवला गेला. सदर लेखमालिका तयार करून उपक्रमाचे उद्गाटन अर्चना कोदे व विठ्ठल लाकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
यावेळी एकूण १२ सदस्यांनी उपक्रमात भाग घेतला. आपल्या आजोळची पुरातन मंदिरे, तेथील पूजा अर्चा पद्धती, परंपरा, उत्सव उरूस, मामा मामी आणि आजी आजोबांच्या आठवणी अशा अनेक बाबींवर लेखन केले गेले.
 
सादर कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध कवी मधू मंगेश कर्णिक यांच्याकडून कौतुक झाले आहे. वयोमानानुसार जरी ते उपस्थित राहू शकले नाही तरीही त्यांनी सदिच्छा संदेश पाठवून कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे कौतुक केले आहे. कोकणातील वाचन संस्कृती जोपासण्यासाठी असे अनेक उपक्रम राबवले जात असून त्याचा आवाकाही वाढवण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर 'पेरते व्हा' हे मासिक सुरु करण्यात येणार आहे.
 
सदर लेखमालेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वजराट, ता. वेंगुर्ला, हंडी जुवा पाणखोल, चांदेर मालोंड, चिंदर, पेंडूर- खरारे, मसुरे देऊळवाडा, ता. मालवण, आरोस, ता. सावंतवाडी, गोवा राज्यातील कोरगाव, ता. पेडणे, रत्नागिरी जिल्ह्यातील नरवण ता. गुहागर, रावारी, ता. लांजा अशा अनेक गावांवरील लेख लिहिले गेले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121