कर्नाटकमध्ये कॉग्रेसच सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण झाला. कॉग्रेसने कर्नाटक निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या घोषणापत्रात काय घोषणा केल्या होत्या. घोषणापत्रात पाच हमी जाहीर केल्या होत्या. या पाच महत्वाच्या निर्णयामध्ये प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन, डिप्लोमा झालेल्या बेरोजगार युवकाला १५०० रुपये बेरोजगार भत्ता तर पदवीधर युवकाला ३००० रुपये भत्ता देण्याचे आश्वासनही कॉंग्रेसने दिलं होतं. सोबत १० किलो तांदूळ, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला २०० युनीट मोफत वीज आणि राज्य परिवहनच्या बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास.
ही सर्व आश्वासन पहिल्या कॅबिनेट बैठकीत मंजुर करू असं ही जाहीर केलं होत. याचं आश्वासनांना भुलून कर्नाटकच्या जनतेने कॉग्रेसला मतं दिली. पण आता सरकार स्थापण होऊन एक महिना झाला तरी आणखी कर्नाटकच्या जनतेला पहिली कॅबिनेट बैठक होण्याची वाट पाहावी लागत आहे. कॅबिनेट बैठकी झाल्या. पण या बैठकींमध्ये कर्नाटक सरकारने लोकांच्या भल्यासाठी नाहीतर आपला हिंदू विरोधी एजेंडा चालवून आपले मतदार असलेल्या धर्मांध आणि कट्टरपंथीय मुस्लीमांना खुश करण्यासाठीच निर्णय घेतले.
१५ जून रोजी कर्नाटकच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदाचा भाजपाने आणलेला अध्यादेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा कायदा काय होता काय होता हे आधी आपण जाणून घेऊ. या कायद्यातील मसुद्यानुसार कोणत्याही व्यक्तीने खोटेपणाने, बळजबरीने, फसवणूकीने, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने किंवा विवाहाद्वारे थेट किंवा अन्यथा कोणत्याही व्यक्तीचे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करू नये किंवा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये. असे करणाऱ्या व्यक्तीवर दखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हा नोंदवला जाईल.
या कायद्यातील मसुद्यामध्ये कुठेही धर्म बदलण्यावर बंदी घालण्यात आलेली नव्हती. या कायद्यात फक्त बळजबरीने किंवा फसवणूकीने करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यात आला होता. जर कोणी धर्मांतर करण्याचा विचार करत असेल तर त्या व्यक्तीला धर्मांतर करण्याच्या दोन महिने अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रीतसर नोटीस द्यावी लागणार होती. यानंतर जिल्हा दंडाधिकारी धर्मांतराचा खरा हेतू काय होता, याची पोलिसांमार्फत चौकशी करुन धर्मांतराला परवानगी देणार होते. अशी या कायद्यात तरतुद होती.
यामुळे या कायद्याला कोणी विरोध करण्याचे कारण नव्हत. मात्र, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या कायद्याला विरोध केला. दररोज हजारों बेकायदेशीर धर्मांतरणाच्या बातम्या कानावर येत असतात. कायद्यामुळे आता अशा गोष्टींना आळा बसणार होता. यामुळे ते नाराज होते. मात्र, तुष्टीकरणाच्या नादात कॉग्रेसने हा कायदाच रद्द केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे.
काँग्रेस तरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या टीपू सुल्तान ने कर्नाटकच्या लाखो हिंदूची हत्या केली. त्या टिपू सुल्तानची जंयती सरकारी खर्चातून करणाऱ्या सिध्दारामय्या यांना आता स्वातंत्रवीर सावरकरांचा इतिहासाच्या पुस्तकांतील उल्लेख आता नकोसा झाला आहे. कर्नाटकमध्ये कॉग्रेस सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कशासाठी तर स्वातंत्रवीर सावरकर आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्यावर इतिहासाच्या पुस्तकातील धडा वगळण्यासाठी.
यानंतर आता कॉग्रेस तुष्टीकरणासाठी शाळा आणि महाविद्यालयात असलेली हिजाब बंदी पण उठवण्याची शक्यता आहे. सोबतच पुन्हा एकदा मुस्लीमांना असंवैधानिक पध्दतीने आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. गौवंश हत्या बंदी कायदा रद्दही केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूकीत जिंकण्याठी दिलेल्या आश्वासनांना मात्र केराची टोपली काँग्रेस दाखवतंयं का हा प्रश्न आहे...