नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये राहणारा खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतार सिंह खांडा यांचा मृत्यू झालेला आहे. यापूर्वी त्याला विषबाधा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता ब्रिटनच्या मेडिकल रेकॉर्डमध्ये अवतारला ब्लड कॅन्सर असल्याची पुष्टी झाली आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांनी अवतार सिंह यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अवतार सिंह यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला होता. त्याला ब्रिटनमधील बर्मिंघम शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अवतार सिंहच्या शरीरात विषही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. अवतार सिंहने तुरूंगात असलेल्या खलिस्तानी अमृतपाल सिंहला तयार केले आणि नंतर त्याला वारिस पंजाब देचा नेता म्हणून पंजाबला पाठवले, असे म्हटले जाते. दीप सिद्धूने वारिस पंजाब देची स्थापना केली होती. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाचा ध्वज उतरवल्याप्रकरणी अवतार सिंहला लंडन पोलीसांनी अटक केली होती. खांदा यांनी शीख तरुणांना बॉम्ब बनवण्याचे आणि आयईडी वापरण्याचे प्रशिक्षण दिले होते.
अवतार सिंह बब्बर खालसासाठी ही काम करत
अवतार सिंह हे ब्लड कॅन्सरशी झुंज देत होता. अवतार सिंहच्या मदतीने अमृतपाल सलग ३७ दिवस लपून बसला होता. भारतीय तपास संस्था NIA ने खांडा आणि इतर तीन फुटीरवाद्यांना ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निषेधाचे सूत्रधार मानले. अवतार सिंह खांडा हा KLF दहशतवादी कुलवंत सिंह यांचा मुलगा होता. २००७ मध्ये मध्ये तो अभ्यासाच्या नावाखाली ब्रिटनला गेला आणि तिथे आश्रय घेतला.
२०२० मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन KLF प्रमुख हरमीत सिंहच्या मृत्यूनंतर , खांदा KLF चे नेतृत्व करत होता.त्याचे सांकेतिक नाव 'रणजोध सिंह' असे होते. अवतार सिंह यांचा शिष्य अमृतपाल सिंह आता त्याच्या ८ साथीदारांसह आसाम तुरुंगात बंद आहे. अमृतपाल सिंह यांची एनआयए चौकशी करत आहे. खांडा यांनी बब्बर खालसासाठीही काम केले. या संघटनेवर जगभरात बंदी घालण्यात आली आहे. अवतार सिंह यांचा जन्म पंजाबमधील मोगा जिल्ह्यात झाला.