मुंबई : महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय तसेच मुंबईतील गोराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय (वॉर म्युझिअम ) बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय, भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क आणि छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय राज्याच्या पर्यटन विभागाकडून उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, शिर्डीला पायी जाणाऱ्या साई भक्तांसाठी पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे विश्रामगृह बांधण्यात येणार असून भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य घोषणादेखील पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केल्या.
शिवनेरी - छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार
गोराई -छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय ( वॉर म्युझिअम )
छत्रपती शिवाजी महाराजांचे Miniature किल्ले, प्रमुख युद्ध, शिवकालीन, युद्ध-विद्यांचे प्रशिक्षण
बुलढाणा - राजमाता जिजाऊ संग्रहालय
जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवार वृक्ष व प्रमुख मावळ्यांचे - तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकारी योध्दे / मावळे यांचा त्याग व जीवन चरित्र.
संभाजी नगर - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, शौर्य व बलिदान कथा.
नाशिक- छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय
छत्रपती शिवाजी महाराजांची नीति - कृषी नीती, आर्थिक नीती व इतर नीतींचा अभ्यास व माहिती
सांगणारे संग्रहालय
रामटेक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व संघर्ष व भारतीय संस्कृति व जागतिक युध्दनितीवर प्रभाव दर्शविणारे
संग्रहालय
भगूर- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकरजींचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख
घटना
कार्ला - आचार्य चाणक्य म्युझिअम.
आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती अर्थनीती सामाजिक नीती युद्ध नीती, धर्म निती व याचसोबत ७
दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम.
पडघा - साई भक्तांसाठी विश्रामगृह
शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तां करीता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे निवासाची व्यवस्था.