मुले तस्करी प्रकरण : ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

    13-Jun-2023
Total Views |
child trafficking case Danapur-Pune Express

मनमाड
: बिहार येथून मुलांची सांगली आणि पिंपरी चिंचवडच्या मदरशात तस्करी करणार्‍या संशयितांना मनमाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दानापूर- पुणे एक्सप्रेस मधून ३० मे रोजी मुलांना तस्करीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी चार संशयितांना अटक केली होती. तसेच, त्यांना १२ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश चांदवड येथील न्यायालयाने दि. १२ जून पर्यत पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत सोमवारी संपली असून सद्दाम हुसेन, नोमन सिद्दीकी, मोहंमद शहानवाजआणि एजाज सिद्दीकी अशी या चौघाची नावे असून चौघानी मदरशात दाखल करण्यासाठी मुलांना घेऊन जाण्याच्या नावाखाली कथित तस्करीचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान, पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे या मुलांची तस्करी होत असल्याचे चौकशीत या आरोपींनी सांगितले आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. त्यामुळे आरोपींना मनमाड कोर्टात हजर करण्यात आले असून चौघाना जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील नियाज अहमद लोधी मालेगावच्या जिल्हा सत्र न्यायलयात अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांचे वकील अ‍ॅड. नियाज अहेमद लोधी यांनी सांगितले.