महाराष्ट्रातही उभारणीला वेग; समुद्री भुयारी मार्गासाठी करार
12-Jun-2023
Total Views | 53
मुंबई : वेगवान प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि देशाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामांना गती मिळाली आहे. गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. बुलेट ट्रेन पकल्पाच्या कामाला महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही वेग आहे. अलीकडेच ठाणे खाडीतील देशातील पहिल्या समुद्रखालून जाणार्या समुद्री भुयारी रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी करार करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाचे काम मार्गी लागणार आहे, तर अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला गती ३४२ किमी व्हायाडक्टमध्ये कामाला वेग आला आहे.
‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन’ (एनएचएसआरसीएल)ने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गाच्या ३४२ किमी व्हायाडक्टमध्ये, २९८ किमी पाईल, २०० किमी पीएर आणि ६४ किमी व्हायाडक्ट गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामेही वेगात सुरू असल्याची माहितीही ‘एनएचएसआरसीएल’ने दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कामांसाठीची प्रक्रियाही सुरू असून नुकताच २१ किमी लांबीच्या भुयारी मार्गासाठी ‘एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कंपनीसोबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या २१ किमीच्या भुयारी मार्गात सात किमी लांबीचा पहिला सागरी भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत बांधला जाणार आहे. यासाठी तीन टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
मुंबई क्षेत्रातील कामे प्रगतिपथावर
मुंबई एचएसआर स्थानक एमएएचएसआर पॅकेज सी मार्च २०२३ रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मुंबई एचएसआर स्थानक आणि शिळफाटा दरम्यान दुहेरी मार्गासाठी बोगद्याचे सुमारे २१ किमी बांधकाम एमएएचएसआर पॅकेज सी२साठी ८ जून रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शिळफाटा आणि झरोली गावांदरम्यान गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील स्थानकांचे स्थापत्य आणि इमारतींची बांधकामे यामध्ये ३ स्थानकांचे म्हणजे, ठाणे, विरार, बोईसर एमएएचएसआर पॅकेज सी ३साठी तांत्रिक निविदा १२ एप्रिल २०२३ रोजी मागविण्यात आल्या होत्या.