असे पण जयंतराव...

    11-Jun-2023
Total Views | 91
Jayant Sahasrabudhe of Vijnana Bharati passes away

जयंतरावांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. काही महिन्यांपासून त्याची दुर्दैवी चाहूल लागतच होती, परंतु ते मनाला पटत नव्हते. ईश्वरेच्छा. पण, लवकरात लवकर भारतमातेच्या सेवेसाठी ते परत येणार व हिंदूराष्ट्र (अखंड) करूनच दाखवणार, हा विश्वास आहे.

 
मी या लेखात पुढे ‘जयंत‘ असेच म्हणणार आहे. कारण, आम्ही जग समजायच्या अगोदर एकमेकांना ओळखत आहोत. आम्ही एका शालेय वर्गातले व एकाच वाडीत राहणारे, त्यामुळे ते प्रचारक निघण्यापूर्वीच्या माझ्या आठवणी मी सांगणार आहे.आम्ही सातवी-आठवीत असू, १९७७-७८ साली... जयंत उत्कृष्ट टेबलटेनिस खेळायचा. एकदा मला म्हणाला, “तो समोरचा खेळतो आहे ना, त्याला मी पाच पॉईंटच्या आत हरवून दाखवतो.“ (म्हणजे २१-५) व तसेच झाले. (२१-१९) पण चालले असते. पण, मङेु रळा ळी लीळाशफ हा धडा तेव्हा शिकलो. पुढे ‘विज्ञान भारती‘चे काम २००९ ते मृत्यूपर्यंत ज्या वेगाने वाढवले तो झपाटा या अनुभवातूनच उगम पावलेला वाटला.
 
१९८१ साली आम्ही आर्यन हायस्कूलमधून दहावी झालो. दहावीला अत्यंत चुरशीची अशी ‘आदर्श विद्यार्थी‘ स्पर्धा असायची. अभ्यास, नाटक, खेळ (अनेक), वक्तृत्व, अशा अनेकाचे मार्क, त्यानंतर लेखी परीक्षा व ऋळपरश्र खपींर्शीींळशुी अशा उेाश्रिशु, अश्रश्र र्ठेीपव व दमछाक करणार्‍या चुरशीच्या स्पर्धेत आम्ही दोघेही इंटरव्ह्युपर्यंत (शेवटच्या पाच) पोहोचलो. पण मी हरलो आणि तो आदर्श विद्यार्थी ठरला. त्याचे अष्टपैलुत्व तेथून समजले. पुढे एकदा (२०१०) साली, आमच्या चाळीची ‘रिडेव्हल्पमेंट’ त्याचाच बंधू विनायक करत असताना व आम्ही सहस्रबुद्ध्यांच्या पाच नं. चाळीतील घरात भाड्याने राहत असताना तो आमच्या घरी आला. मी त्याला अभिमानाने सांगितले की, “माझी मुलगी सई आर्यन शाळेतच आदर्श विद्यार्थिनी झाली (मला जमले नाही).“ तेव्हा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, “यात तुझे ‘केड्रिट’ नाही, ती या घरात राहत आहे. हा जागेचा गुण आहे.“ यातून त्याच्यातील उत्स्फूर्तता, हजरजबाबीपणा कळला.


मला चांगले आठवते आम्ही १९८२-८३ साली अकरावी-बारावीत गिरगावात भटच्या क्लासला जात होतो. तेव्हा एका वर्गात ३०० ते ४०० मुले एकत्र शिकायचो (साहित्य संघ), एकदा एका मुलाने, मुलीला खडू मारला. दुसर्‍या दिवशी मुलीने भट सरांकडे तक्रार केली. भटाने सर्व मुलांना उभे केले. विचारले कोणी खडू मारला ते सांगा. नाही सांगितले, तर सर्वांना पट्याने मारेन. त्यांनी आम्हा पाच मुलांना उभे केले व म्हणाला, “ही नक्की मारणार नाहीत. तुम्ही आज घरी जा, मी बाकीच्यांना बघतो.“ जयंताचा प्रामाणिकपणा व नैतिकतेच्या विश्वासामुळे आमचीपण सुटका झाली. माझे इंजिनिअरिंग पूर्ण झाले, त्याचे ‘बीएस्सी-टेक’चे शेवटचे वर्ष चालू होते. तो रामजन्मभूमी-पोस्टर्स लावण्याचा काळ चालू होता. त्यावेळी जयंतची दिनचर्या थक्क करणारी होती.

 बहुतेक तो नगर सहकार्यवाह असावा. सकाळी प्रभातशाखा, नंतर कॉलेज, संध्याकाळी संघ बैठका व त्यानंतर रात्री १० ते १२ वाजेपर्यंत गिरगावात वॉल पेटिंग व पोस्टर्स लावणे. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अव्याहत उत्साहाचा झरा मी अनुभवला आहे.१९८८-८९च्या काळात तो प्रचारक निघणार असे मला समजले. माझ्यावर पण दबाव होता, पण माझे धैर्य झाले नाही. मी त्याचवेळी त्याला वचन दिले की, २० वर्षं नोकरी करीन व नंतर संघाचे काम करीन. देवाच्या कृपेने व जयंतच्या त्या प्रेरणेने मी २००७ साली आयटी करिअर सोडून परत, गिरगाव नगरात सहकार्यवाह म्हणून काम सुरू केले. प्रभात, सायम, रात्र रोज तीनही शाखांत जायला लागलो. त्यावेळी जयंतराव कोकण प्रांत प्रचारक होते व मला माझे वचन पूर्ण केल्याचे समाधान होते.

एक शेवटचा व सर्वांत महत्त्वाचा अनुभव सांगतो. गिरगावात काळविट कुटुंबामध्ये जयंतराव दोन मुलांबरोबर खूप वेळ घालवायचे. बाकी सर्व त्याला म्हणायचे, “हे ’बाल’ कधीही शाखेत येत नाहीत, घर पण संघाचे नाही. तू एवढा वेळ का देतोस?“ पण, आज हेच दोघे उच्चशिक्षित, एक हजार तरुणांचे गिरगाव ध्वजपथक उभे करणारे, एक जनकल्याण समिती, तर दुसरा संघाचा नगर कार्यवाह. वेळेची गुंतवणूक म्हणजे काय, हे आता समजले आहे.आयुष्यात पहिल्यांदाच लेख लिहिण्याचे धाडस करत आहे. जयंतरावांच्या स्मृतीस मनापासून अभिवादन. तुझ्याकडून खूप शिकलो रे मित्रा!



-अतुल वझे

९९८७७५८२५०



 
अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121