पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ!

    11-Jun-2023
Total Views |
Fuel Price Hike


नवी दिल्ली : पंजाबमध्ये पेट्रोल ९२ पैशांनी तर डिझेल ८८ पैशांनी महागले आहे. कर आकारणी विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे पंजाब सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे.राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे एक रुपयाची वाढ केली आहे. वाढलेले दर मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होतील.
 
सुमारे १.८ टक्के वाढ झाली

राज्य सरकारने पेट्रोल व्हॅट दरात सुमारे १.८ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ९२ पैशांनी महागले आहे. तर व्हॅट दरात १.१३ टक्क्यांनी वाढ झाल्याने डिझेल प्रतिलिटर ९० पैशांनी महागले आहे. या दरामध्ये १० टक्के अधिभार देखील समाविष्ट आहे. दरम्यान , येत्या काही दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी दर कमी केले तर त्याचा फायदा पंजाबच्या जनतेला मिळणार नाही.
 
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.१९ पैसे दराने उपलब्ध आहे

पंजाबमध्ये पूर्वी ९८.३ रुपये उपलब्ध असलेले पेट्रोल राज्य सरकारने व्हॅट वाढवल्यानंतर आता ते ९८.९५ रुपये झाले आहे. तर ८८.३५ रुपयांना उपलब्ध असलेल्या डिझेलचा दर ८९.२५ रुपयांवर पोहोचला आहे. सध्या हरियाणात पेट्रोलची किंमत ९७.८२ पैसे आणि डिझेलची किंमत ९०.५३ पैसे आहे. तर चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.१९ पैशांनी उपलब्ध आहे.

चन्नी यांच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला

राज्यातील माजी काँग्रेसच्या चन्नी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटचे दर कमी केले होते. यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर १० रुपये आणि डिझेलच्या दरात ५ रुपयांनी कपात करण्यात आली. त्या काळात डिझेलवर ९.९२ टक्के आणि पेट्रोलवर १३.७७ टक्के व्हॅट होता. चन्नी यांनी दावा केला होता की, गेल्या ७० वर्षांत पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधीच इतक्या कमी झाल्या नाहीत. ते म्हणाले होते की १० रुपये एकदाच कमी केले नाहीत.