मुंब्रा ‘मोबाईल जिहाद’द्वारे धर्मांतर प्रकरण; फरार शाहनवाजचे बँक खाते गोठवले

    10-Jun-2023
Total Views | 66
Mobile Jihad Case Mumbra

ठाणे
: ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांना धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान हा अद्याप फरार असून पोलिसांनी त्याचे बँक खाते गोठवले आहे. तसेच, त्याच्या बँक खात्यातील व्यवहार तपासण्यात येत असून त्याद्वारे तपासाची दिशा ठरवली जात आहे. दरम्यान, शाहनवाज याच्या आईची पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने ४०० मुलांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्र्यात आढळल्याने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांचे पथक मुंब्य्रात ठिकठिकाणी गस्त घालून या धर्मांतरकांडातील शाहनवाज खान या आरोपीचा शोध घेत आहेत. शाहनवाज खान राहत असलेले मुंब्र्यातील देवरीपाडा येथील शाजिया बिल्डिंगमधील घरावर पोलिसांची करडी नजर आहे.
मुंब्र्यातील शाहनवाज खान हा फरार असला तरी गाझियाबाद पोलीस हे मुंब्रा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध घेत आहेत. काल याच प्रकरणी ठाणे पोलीस उपायुक्त कार्यालयात शाहनवाजच्या आईला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, हळूहळू आता पोलीस आपली पकड आवळत असल्याचे दिसून येते.

याच धर्मांतर प्रकरणी आता पोलिसांनी शाहनवाजचे बँक खाते गोठवले आहे. शाहनवाजच्या या खात्यात पोलिसांना 19 हजार रुपये इतकी रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे आता शाहनवाजने कुठूनही पैसे काढण्याचा किंवा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तरी शाहनवाजच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121