गुजरातमध्ये इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
10-Jun-2023
Total Views | 82
नवी दिल्ली : गुजरातमधील पोरबंदरमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिस मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी भारतातील रहिवासी आहेत. यामध्ये उबेद नासिर मीर, हनान हयात शवाल, मोहम्मद हाजीम शाह आणि जुबेर अहमद मुन्शी आणि सुरतमधील सुमेरा बानो या चार जणांचा समावेश आहे. पाचवा आरोपी जुबेर अहमद मुन्शी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
काश्मीरमधील तीन रहिवासी त्यांचा हस्तक अबू हमजाच्या मदतीने इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांतात (आयएसकेपी) सामील होण्यासाठी समुद्रमार्गे पळून गेले होते. त्यांच्याकडून इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांताचे साहित्य आणि चाकूसारखी धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एटीएसचे पथक दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांना पकडण्यासाठी सातत्याने छापे टाकत आहे.
दहशतवादी संघटना आयएशकेपीशी संबंधित एका महिलेला सुरतमधून अटक करण्यात आली होती. या महिलेला एटीएसने गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने पकडले. शहरातील लालगेट भागातून सुमेरा नावाच्या महिलेला ताब्यात घेऊन पोरबंदरला नेण्यात आले असून तिच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोरबंदर येथून आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दहशतवादविरोधात झिरो टॉलरन्स – हर्ष संघवी, गृहमंत्री, गुजरात
गुजरात पोलिस, एटीएसचे पथक आणि सुरत गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. दहशतवादी मनसुब्यांना तोडण्याचे काम गुजरात पोलिस करत असून त्याविषयी झिरो टॉलरन्सची निती वापरण्यात येत आहे. गुजरात पोलिसांनी आयएसकेपीच्या संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिस याप्रकरणी मूळापर्यंत तपास करणार आहेत.