नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक असल्याचे तेलंगणाचे मंत्री व भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी म्हणटले आहे. प्रियांका गांधीची तेलंगणात सभा होणार आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे सर्वसमावेशक धोरण काँग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस हे एक बूडते जहाज आहे. बेरोजगार राजकीय नेते तेलंगणाच्या युवकांना भडकावत आहेत, अशी टीका ही केटीआर यांनी केली.
केटीआर यांनी प्रियांका गांधी यांच्या हैदराबाद दौऱ्याला राजकीय पर्यटन असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'हैदराबाद हे जागतिक शहर आहे, जे दररोज लाखो पर्यटकांचे स्वागत करते. प्रियंका गांधींसारख्या राजकीय पर्यटकांचेही ते स्वागत करते. प्रियांका गांधी दि.८ मे रोजी हैदराबादच्या सरूरनगर भागात युवा संघर्ष सभेला संबोधित करणार आहेत आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
तसेच केटीआर म्हणाले की, काँग्रेसने सत्तेत असताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले नाही आणि आता तेलंगणा सरकारला ज्ञान देत आहे, जे सातत्याने सर्व पॅरामीटर्सवर चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बुडणाऱ्या जहाजाने आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय पर्यटनाचे शैक्षणिक पर्यटनात रूपांतर करावे आणि बीआरएसकडून शिकावे असा सल्ला त्यांनी दिला.