नवी दिल्ली :द केरला स्टोरी चित्रपटाद्वारे माध्यमातून देशाविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा केवळ चित्रपट नाही, तर भारताविरुद्ध इसिससारख्या संघटनांच्या नापाक कारस्थानांचा पर्दाफाश करणारा हा दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केले आहे.
गेल्या एक दशकापासून काँग्रेस आणि डावे जे सत्य देशाला नाकारत होते ते आज आपल्यासमोर आले आहे. भारतातील निष्पाप मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दहशतवादी संघटनांमध्ये कसे भरती केले जाते हे सत्य प्रथमच मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशाविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. केरळमध्ये सुरू असलेला जागतिक दहशतवादाचा धोकादायक कारस्थान पहिल्यांदाच एका चित्रपटाने संपूर्ण भारत आणि जगासमोर इतक्या उघडपणे दाखवला आहे. गेल्या एक दशकापासून काँग्रेस आणि डावे जे सत्य देशाला नाकारत होते ते आज आपल्यासमोर आले आहे. दहशतवादाच्या या राक्षसापासून आपल्या बहिणी, मुली आणि मुलांना वाचविण्याचा इशाराच या चित्रपटाद्वारे मिळाल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
तुष्टीकरणाच्या राजकारणात गुंतलेल्या काँग्रेस आणि डावे पक्ष दहशतवादी कटाचे समर्थन करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केला. ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि डाव्यांनी सांगावे की ते भारतातील निष्पाप मुलींच्या पाठीशी उभे आहेत की विरोधात आहेत ?. ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी घालून पश्चिम बंगालच्या बहिणी आणि मुलींवर अन्याय केला आहे. असा विचार त्या दहशतवाद्यांना बळ देतो, असेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नमूद केले आहे.