टोकियो : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा असणार्यांच्या संख्येत वेगाने घसरण होत आहे. धर्मावरील उदासीनतेमुळे अनेक लोकांनी चर्चमध्ये जाणे बंद केले आहे. जपानमध्येही श्रध्दाळूंच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी विश्लेषक धार्मिक समूहांना देशातील राजकीय जगाशी जोडणार्या अनेक घटना आणि घोटाळ्यांना दोष देत आहेत. टोकियोतील त्सुकीजी होंनागजी मंदिरात या वर्षी झालेल्या सर्वेक्षणात सुमारे १,६०० लोकांना विचारले की, त्यांच्या धर्मावरील श्रद्धेत काही बदल आला का? त्यात धक्कादायक बाब समोर आली आहे.
जपानमध्ये जवळपास ६७% बौद्ध आहेत. शिंटोवाद दुसरा सर्वात मोठा धार्मिक समूह आहे. यानंतर ख्रिश्चन धर्म आहे. ६० पेक्षा कमी वयाचे बहुतांश पुरुष आणि महिलांना वाटते की, त्यांच्याकडे बौद्ध विहारात जाण्याचे कोणते कारण नाही. १९९० च्या दशकाच्या मध्यात सर्वनाश पंथ ओम शिनरिक्यो प्रमुख गुन्हेगारी प्रकरणांच्या एका मालिकेचा केंद्र बिंदू होता. त्यादरम्यान धार्मिक संघटनांत जपानी लोकांचा विश्वास डळमळीत झाला होता.
युनिफिकेशन चर्चची घुसखोरी
माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांची हत्या एक दुखद घटना होती. त्या घटनेने जपानी लोकांना जागे करण्याचे काम केले. यूनिफिकेशन चर्चने जपानी राजकारणात किती खोलवर घुसखोरी केली याची जाणीव येथील लोकांना झाल्याचे प्रा. हिरोमी मुराकामी म्हणाले.
वासेदा विद्यापीठातील प्रा. तोशिमित्सु शिगेमुरा म्हणाले, ओम शिनरिक्योसारखे समूह धोक्यांमुळे भयभीत होते. मात्र, चर्चचा खुलासा धक्कादायक बाब ठरली. लोकांनी धर्माकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. धार्मिक श्रध्दा कमी होत असल्यामुळे रुढीवादी चिंतेत आहेत.
१६०० जणांचा सर्वेक्षणात सहभाग
३९.७ टक्के धर्माप्रति विश्वास कमी झाल्याचे मान्य
१८ ते ४९ वयाच्या महिला धर्माप्रति नकारात्मक
५०% महिलांचा धर्मावरील त्यांचा विश्वास कमी झाला आहे.
३५ टक्के लोकांना धर्माप्रति भावना अडचणीची वाटते