मुंबई : रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो साखर कारखाना हंगामाआधीच सुरु केल्याने ४.५ लाखाचा दंड भरावा लागणार आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या वर्षीचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाच आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यात १२ तारखेपासून गळीत हंगाम सुरू केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या ॲग्रो साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.