२६/११ च्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्याचा मृत्यू

    31-May-2023
Total Views | 46
Abdul Salam Bhuttawi terrorist

मुंबई
: २६/११ चा दहशतवादी हल्ला अजूनही मुंबईकर विसरु शकलेले नाहीत. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. ही ट्रेनिंग देणारी व्यक्ती लष्कर ए तोयबाचा कमांडर अब्दुल सलाम भुट्टावी होती. याच भुट्टावीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. कमांडर भुट्टावी हा पाकिस्तानात कैदेत होता. तेथे शिक्षा भोगत असताना त्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यु झाला. भुट्टावीला संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१२ साली दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तसेच, त्याला २०२० मध्ये दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला पाकिस्तानातील कोर्टाने १६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्याचा पाकिस्तानातील तुरुंगात शिक्षा भोगत असताना मृत्यु झाला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121