साक्षीच्या बाबतीत घडलं ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं : शेफाली वैद्य
30-May-2023
Total Views | 275
मुंबई : कालच्या त्या दिल्लीच्या विडीयोने हादरून गेलेय मी. अजून ते दृश्य नजरेसमोरून हटत नाही. तीस-चाळीस वेळा साहिल सर्फराझ नावाचा नराधम साक्षी नावाच्या फक्त सोळा वर्षांच्या मुलीला भोसकतो, भर रस्त्यात. त्यानंतर तिला लाथेने तुडवतो आणि इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात हाणतो, एकदा नाही, दोनदा, तीनदा. हे सर्व चालू असताना त्या गल्लीतून माणसे जात-येत असतात, बायका, पुरुष. हे भीषण क्रौर्य लोक शांतपणे बघतात, माना वळवून वळवून बघतात. पण कुणालाही असे वाटत नाही की घडीभर थबकावे, त्या पोरीला मदत करावी. सीसीटीव्ही व्हिडियो मध्ये आवाज नाही येत पण हे घडत असताना प्राणांतिक वेदनांनी किती किंचाळली असेल ती मुलगी, किती रडली-भेकली असेल. तरीही कुणालाही का नाही वाटलं तिच्या मदतीला जावं असं?
तो क्रूरकर्मा एकटा होता, त्याची पाठ लोकांकडे होती, बाजूलाच एक दगड विटांची रास होती. कुणालाच का नाही वाटलं की त्या राशीमधली एक वीट उचलून त्या नराधमावर भिरकावून मारावी? बरं, व्हिडियो बघून असंही दिसत नाही की लोक घाबरून दूर पळालेत. एका कोवळ्या मुलीला आपल्या डोळ्यासमोर भोसकले जातेय हे बघूनही लोक आपल्या वाटेने कमालीच्या शांतपणे चालत जात आहेत, जसे काही घडलेच नाही. इतके मुर्दाड, संवेदनाशून्य, भ्याड झाले आहेत का दिल्लीचे लोक एक समाज म्हणून? रस्त्यावरच्या एखाद्या भटक्या कुत्र्याला जरी दगड मारला तरी इतर कुत्री त्याच्या मदतीला धावून येतात, दगड मारणाऱ्या व्यक्तीला घेरतात, प्रसंगी हल्लाही करतात. जी सामाजिक जाण भटक्या कुत्र्यांनाही उपजत असते ती माणसांना नसावी?
तो जो साहिल खान होता तो हा खून करून बुलंदशहरला पळून गेला. त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. त्याच्या मुर्दाड चेहेऱ्यावरून वाटतंय की त्याला केलेल्या ह्या अमानुष कृत्याचा ना खंत ना खेद. इतकं क्रौर्य कुठून येतं वीस वर्षांच्या तरुणामध्ये? साक्षी फक्त सोळा वर्षांची होती, अल्पवयीन होती. तिला हा साहिल भेटला कुठे आणि कसा? ती हिंदू होती, तो मुसलमान, मग हा लव जिहादचा प्रकार होता का? कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत. दुर्दैवाने साहिल शांतीप्रिय समाजाचा असल्यामुळे मानवी हक्क वाल्या लोकांचा आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा लाडका आहे. त्याला अटक झालीय, पण मला खात्री आहे की त्याला पाच-दहा वर्षांच्या तुरुंगवासापेक्षा फार काही सजा होणार नाही. त्यातही त्याला ‘चांगल्या वर्तणुकीमुळे’ अर्धी सजा माफ होईल आणि दिल्ली सरकारतर्फे एक शिलाईयंत्र देऊन त्याचा सत्कारही करण्यात येईल. कारण त्याचे नाव खान आहे आणि तो संविधानाचा जावई आहे.
अर्थात कायद्याने साहिल सर्फराझ खानला काहीही शिक्षा झाली तरी साक्षी परत येणार नाही की तिच्या प्राणांतिक वेदना कमी होणार नाहीत. कालपासून मी स्वतःला विचारतेय, मी जर त्या गल्लीत त्या वेळी असते तर मी काय केलं असतं? माझ्यात असती का हिंमत त्या मुलीसाठी काही करण्याची? स्वतःच्या सतसद्विवेकबुद्धीला स्मरून सांगते, मी नक्कीच त्या विटा योग्य प्रकारे वापरल्या असत्या. जे साक्षीच्या बाबतीत घडलं ते कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. तिच्या जागी स्वतःच्या घरातल्या, नात्यातल्या एखाद्या मुलीला कल्पून पहा आणि स्वतःला विचारा हा प्रश्न की त्या दिवशी, त्या वेळी तुम्ही त्या गल्लीत असता तर तुम्ही काय केलं असतं? जो अन्यायाला आपल्या परीने प्रतिकार करतो तोच समाज जिवंत असतो, जिवंत राहतो. मुर्दाड, प्राणहीन चालती-बोलती प्रेते बनून काय उपयोग आहे?