मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी जाण्याची शक्यता!

    03-May-2023
Total Views | 51
Karnataka Election 2023

मुंबई
: कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेससह जेडीएसचं प्रमुख आव्हान असणार आहे. हे पाहता कर्नाटकात घट्ट पाय रोवण्यासाठी भाजपाने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यांच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ आणि ७ मे रोजी कर्नाटक दौरा करणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकात जाणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड हे नेते देखील प्रचाराकर्ता कर्नाटकात जाणार आहेत. मात्र यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही.

कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळेच प्रचारासाठी जोरदार तयारी करत भाजपने कर्नाटकावर लक्ष केंद्रीत केले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121