वाडा : तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायती कडून विविध विकास कामांचा शुभारंभ आज (२८ मे) रोजी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात करण्यात आला. कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत काॅक्रिटी रस्ते, पाईप गटार बांधणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, अशा स्वरुपातील १२ विकासकामांची उद्घाटने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सरपंच राजेंद्र कोंगील,उपसरपंच गिरीष चौधरी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, रिजवान पटेल, अल्लारक मेमन, मुद्दसर पटेल, प्रकाश पाटील, रफिक मेमण, अविनाश चौधरी,नुमान पटेल,प्रकाश शेट्ये, कादंबरी चौधरी,किशोर जाधव, विकास जाधव, पंढरीनाथ पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुडूस विकास आघाडीचे प्रकाश शेट्ये यांनी सर्व विकास कामांचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणींवर मात करून गावातील सर्व प्रलंबित कामे अशीच पूर्ण होतील असा विश्वास उपस्थित ग्रामस्थांना दिला.