नेहमी सकारात्मक राहण्यासाठी आणि निरोगी संज्ञानात्मक कार्य तयार करण्यासाठी तुम्हाला मेंदूच्या आरोग्यावर पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे. सकारात्मक भावनांद्वारे आपण मिळवलेले वैयक्तिक स्रोत टिकाऊ असतात. ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि लवचिकता निर्माण करतात.
एक सकारात्मक दृष्टिकोन तणावाच्या वेळी सशक्त प्रतिकार करण्यासाठी मानसिक संसाधने तयार करतो. त्या संसाधनांमध्ये मुख्यत्वे लवचिकता, आशावाद आणि सर्जनशीलता समाविष्ट आहे. या मानसिक संसाधनांचा तुमच्या आरोग्याच्या इतर क्षेत्रांवर अनेक पटीने प्रभाव पडतो. नकारात्मक विचार आपली विधायक ऊर्जा रोखू शकतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला पावले उचलण्यापासून रोखू शकतात. याउलट, सकारात्मक विचार आणि आत्मसंवाद आपली ऊर्जा सक्रिय करू शकतात आणि आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने पावले उचलण्यास मदत करू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, गुलाबी रंगाच्या चश्म्यातून जीवनाकडे पाहण्याची सवय असलेल्या लोकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आरोग्यासाठी फायदे मिळू शकतात.
आशावाद दीर्घायुष्याला प्रोत्साहन देतो हे आपल्याला माहिती आहेच. सकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक वयोमानानुसार नकारात्मक वृत्ती असलेल्या लोकांपेक्षा जास्त जगतात, हे संशोधनातून दिसून आलेले आहे. अलीकडच्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, सौम्य संज्ञानात्मक कमजोरी (सौम्य स्मृतिभ्रंश) असलेल्या वृद्ध प्रौढांना, जर वृद्धत्वाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असल्यास, वृद्ध होण्याबद्दल नकारात्मक विश्वास असलेल्या लोकांपेक्षा आकलनत्माक क्षमता परत मिळण्याची शक्यता ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, अभ्यास सूचवितो की, सकारात्मक दृष्टिकोन असल्यास स्मरणशक्तीच्या समस्या कमी असतात, हृदयाचे चांगले आरोग्य लाभते आणि रक्तातील साखरेचीपातळी समतोल राहते. स्मरणशक्ती आणि विचारसरणीच्या समस्या जसजसे तुम्ही वयाने मोठे होत जाता, तसतसे अधिक सामान्य दिसू लागतात.
परंतु, प्रत्येकजण त्यांना अनुभवेल असे नाही. तुम्हाला अचानक विस्मरण होत असल्याचे जाणवत आहे किंवा स्पष्टपणे विचार करण्यासाठी झगडावे लागत आहे, असे दिसल्यास तुम्हाला स्मरणशक्तीची समस्या उद्भवू लागली आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग’नुसार, सौम्य संज्ञानात्मक कमजोरी (एमसीआय) ही स्मृती किंवा विचार यांची समस्या आहे. जी स्मृतिभ्रंशाइतकी गंभीर जरी नसली तरी नक्कीच लक्षात येण्याजोगी असते. सौम्य संज्ञानात्मक कमजोरीच्या लक्षणांमध्ये विचारांच्या स्पष्टतेबद्दल काहीतरी योग्य दिसत नाही, अनेकदा वस्तू गमावणे, कार्यक्रमांना किंवा भेटींना जायचे विसरणे, समान वयोगटातील इतर लोकांपेक्षा शब्द शोधण्यामध्ये अधिक त्रास होत आहे, हे समाविष्ट असू शकते.
‘येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चा एक अभ्यास अलीकडे प्रकाशित झाला. बहुतेक लोक असे गृहीत धरतात की, सौम्य संज्ञानात्मक कमजोरी (एमसीआय) मधून कोणीही बरे होत नाही. परंतु, प्रत्यक्षात, मात्र त्यापैकी निम्मे बरे होतात असे दिसते. काही का बरे होतात आणि इतर का बरे होत नाहीत, याबद्दल फारशी माहिती उपलब्धनाही. म्हणूनच ते उत्तर सापडेल का, हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी वयाबद्दल सकारात्मक विश्वास असलेल्या लोकांकडे पाहिले. सकारात्मकता स्मृतिभ्रंश कमी होण्यास मदत करू शकते, या त्यांच्या गृहीतकाची चाचणी घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी आरोग्य आणि सेवानिवृत्ती या एका राष्ट्रीय अभ्यासातून १ हजार, ७१६ सहभागींवर अभ्यास केला.
सहभागींचे सरासरी वय सुमारे ७८ वर्षे होते आणि अभ्यासाच्या सुरुवातीस त्यांना एकतर स्मृतीची समस्या होती किंवा सामान्य स्मृती होती. अभ्यासाचे मूल्यमापन केल्यानंतर, शास्त्रज्ञांना असे आढळले की, अभ्यासाच्या सुरुवातीला वयाबद्दल सकारात्मक विश्वास असलेल्या गटातील वृद्ध प्रौढांना त्यांच्या सौम्य संज्ञानात्मक कमजोरीतून (एमसीआय) बरे होण्याची शक्यता ३०.२ टक्क्यांनी जास्त होती. याव्यतिरिक्त अभ्यासाच्या प्रारंभी ‘एमसीआय’ नसलेल्या, पण ज्यांना वयाबद्दल सकारात्मक विश्वास होता, त्यांना पुढील १२ वर्षांमध्ये अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता फार कमी होती. शिवाय, सर्व सहभागींमध्ये, वृद्धत्वाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगणार्यांमध्ये ‘एमसीआय’चा एकूण प्रसार कमी होता. वृद्धत्वाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असलेलेलोक अधिक सामाजिक आणि ‘आऊटगोईंग’ असतात. तसेच, वाढत्या वयाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या तुलनेत, नियमितपणे व्यायाम करून आणि निरोगी आहार घेऊन स्वतःची व्यवस्थित काळजी घेण्याची सवय त्यांच्यात अधिक असल्याची शक्यता दिसून आली आहे.
लोकांमध्ये मिसळणे, नियमित व्यायाम करणे आणि निरोगी पोषक आहार घेणे हे मेंदूची आकलनक्षमता कमी होण्यासाठी संरक्षणात्मक आहे. सकारात्मक विचार करून, तुम्ही उच्च-क्रमाच्या विचार कौशल्याची क्षमता वाढवू शकता. तसेच, संज्ञानात्मक प्रक्रियांचे विश्लेषण आणि नियंत्रण विशेषत: शिकण्याच्या वातावरणात व्यवस्थित करू शकता. नेहमी सकारात्मक राहण्यासाठी आणि निरोगी संज्ञानात्मक कार्य तयार करण्यासाठी तुम्हाला मेंदूच्या आरोग्यावर पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे. सकारात्मक भावनांद्वारे आपण मिळवलेले वैयक्तिक स्रोत टिकाऊ असतात. ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि लवचिकता निर्माण करतात. अशाप्रकारे वैचारिक लवचिकतेच्या निर्मितीमध्ये सकारात्मक भावना मुख्य चालक आहेत. सकारात्मक विचार मेंदूला सर्जनशीलतेने कसे जोडले जातात, शक्यतेची जाणीव कशी विस्तृत करतात आणि तुमच्या जीवनात एक अस्सल मूल्य निर्माण करण्यासाठी तुमचे मन कसे फुलवतात, यावर शास्त्रज्ञांनी विचार केला आहे.
सकारात्मक विचारांमुळे सकारात्मक भावना निर्माण होतात, ज्या आपल्या मेंदूच्या बौद्धिक पोषणाची जबाबदारी घेतात. पूर्ण दिवसासाठी मूड टिकवायचा असेल, तर आपल्या दिवसाची सुरुवात जोरदार आणि कर्तृत्वाच्या भावनेने करा. कदाचित, सकाळी तुमचे अंथरुण घडी करून ठेवल्यानेसुद्धा, तुम्हाला कार्य पूर्ण केल्याची भावना मिळेल आणि त्यामुळे यशाची व समाधानाची भावना उत्पन्न होईल. सकाळी ध्यान करा. कारण, ते आपले विचार आणि भावना मजबूत करेल. संपूर्ण आत्मचिंतन प्रक्रिया आपला तणाव कमी करेल. लवचिकता आणि शारीरिक संतोष वाढवेल. या क्रियाकलापातून मिळणारे मुख्य फायदे म्हणजे चित्त केंद्रित होईल आणि विचारांचे नियोजन होईल, ज्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी मदत मिळेल. अध्यात्मात रमल्याने जीवन नक्कीच शांतचित्त आणि प्रसन्न राहील. जरी एखाद्या व्यक्तीला वृद्ध होण्याबद्दल आशावादी वाटत नसले तरीही, त्या विचारांना पुनरुज्जीवन करण्याचे आणि वृद्धत्वाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे मार्ग आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर आनंद मिळवा, लक्ष केंद्रित करा, सामाजिकरित्या व्यस्त राहा आणि सर्वांत वाईट काळातही समाधानाचा मार्ग स्वीकारा.