मी... येसूवहिनी सांगीतिक अभिवाचनाने भारावले सभागृह

    24-May-2023
Total Views | 75
pune maharashtra Tourism Corporation

पुणे
: महाराष्ट्र शासनाचे पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहात मी येसुवहिनी या समिधा पुणे प्रस्तुत एक सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सेवासदन या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या अभिवाचनावेळी अवघे सभागृह भारावून गेले होते.

यावेळी सभागृहातील सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून केलेले सांगितिक अभिवाचन मनाचा ठाव घेऊन गेले. कार्यक्रमाची संकल्पना व गीतगायन संगीता ठोसर यांनी केले. तर संहितालेखन डॉ चित्रलेखा पुरंदरे यांनी केले होते. अभिवाचन वीणा गोखले, संजय गोखले, विनोद पावशे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून दिलीप ठोसर यांनी काम पाहिले.

स्वा. सावरकरांच्या जाज्ज्वल्य देशभक्ती बद्दल असंख्यांच्या, अगणितांच्या मनांत आदर, अभिमान आणि निष्ठा आहे. मात्र, खुद्द सावरकरांना कोणाबद्दल आदर वाटत होता, त्यांचे स्फूर्ती स्थान कोणते? ...आणि तेच का? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ऐकलाच आणि पाहिलाच पाहिजे असा हा कार्यक्रम ठरला स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना मातृतूल्य असणार्‍या सतीसावित्री सारख्या त्यांच्या वहिनी... येसूवहिनी यांच्यातील दिर भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडून दाखविण्यात आले. तसेच येसूवहिनींच्या मनांत त्यांच्या तेजस्वी दीराबद्दल काय भावना होत्या हे विशद या अभिवाचनामधून विषद करण्यात आले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121