ठाणेकरांनो! पाणी जपून वापरा! गुरुवार-शुक्रवार 'या' भागांत पाणी येणार नाही!

    24-May-2023
Total Views | 93
STEM Authority Thane Municipality

ठाणे
: स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी पाडा, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

गुरूवारी कोपरीत पाणी नाही

कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार, दि. २५ मे सकाळी ९ पासून ते शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ पर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121