दोन हजारांच्या नोटेनंतर आता पाचशेच्या नोटांसंदर्भात मोठी अपडेट

    23-May-2023
Total Views | 1635
big update regarding 500 notes

मुंबई
: दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे आता पाचशेच्या नोटांची मागणी बाजारात वाढणार आहे. त्यामुळेच नाशिकरोडमधील करन्सी नोट प्रेसमध्ये पाचशे नोटांची अधिक छपाई करण्यात येणार आहे. पाचशेच्या १९७५ दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गट करन्सी नोट प्रेसला देण्यात आलेले आहे. तसेच नाशिकसह देवास येथील प्रेसला तीनशे ते चारशे दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयामुळे छपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. २ हजारांच्या नोटाबंदीमुळे ५०० च्या नोटांच्या अतिरिक्त छपाई करता देवास येथील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ११-११ तास काम करण्याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांसमोर असल्याचे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ तासांच्या दोन शिफ्ट करून काम करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण २२ तास काम चालणार आहे. सध्या देवास येथील नोटप्रेसमध्ये १,१०० कर्मचारी कार्यरत आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121