मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर!

    20-May-2023
Total Views | 233
mumbai metro

मुंबई
: मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मुंबई मेट्रोकडून नेटवर्कसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रोच्या खांबावर एक सुक्ष्म दूरसंचार उपकरण बसविले जाणार आहे. त्यामार्फत प्रवाशांना सुपरफास्ट नेटवर्कचा आनंद उपभोगता येणार आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंड नेटवर्कचा फायदा होणार आहे. मेट्रोमार्ग २ अ आणि ७ च्या १५०० खाबांवर हे दूरसंचार उपकरण बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी परवानगी सरकार मेट्रो प्राधिकरणाला देणार असल्याचे समजते आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या व मेट्रोमार्गाच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना हाय कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. आणि हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट याच्यामागे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121