शिखविरोधी दंगल; काँग्रेस नेता टायटलरविरोधात दोषारोपपत्र दाखल

    20-May-2023
Total Views | 42
titler1

नवी दिल्ली
: सीबीआयने काँग्रेस नेता जगदीश टायटलरविरोधात १९८४ सालच्या शिखविरोधी दंगलप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली दिल्ली येथे शिख समुदायाविरोधात दंगली झाल्या होत्या. या दंगली भडकविण्यामागे काँग्रेस नेता जगदीश टायटलर याचा प्रमुख समावेश होता, त्यासाठी त्यांच्याविरोधात विविध खटले दाखल आहेत. या दंगलीतील पुल बंगश गुरुद्वारा अग्निकांड प्रकरणात सीबीआयने त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

टायटलर याच्यावर जमावास चिथावणी देऊन दंगल भडकविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम १४७, १४८, १४९, १५३ (अ), १८८, १०९, ३०२, २९५ आणि ४३६ या विविध कलमांखाली दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, गत महिन्यात एप्रिलमध्ये टायटलर यास शीखविरोधी दंगलीच्या संदर्भात त्याच्या आवाजाचा नमुना देण्यासाठी सीबीआयसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ३९ वर्षे जुन्या दंगलीच्या प्रकरणात सीबीआयला नव्याने काही पुरावे आढळले आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा नव्याने तपास केला जात असून त्यासाठी टायटलर याच्या आवाजाची नमुने घेण्यात आले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121