केंद्र सरकारची ९ वर्षे रोजगाराभिमुख धोरणाची : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरातील ७१ हजार जणांनी नोकरी नियुक्तीपत्रांचे वाटप

    16-May-2023
Total Views | 55
narendra modi

नवी दिल्ली
: केंद्रसरकारने गेल्या ९ वर्षांमध्ये देशातील तरुण वर्गास संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीचे धोरण ठेवले आहे. त्याचप्रमाणे नोकरी भर्तीप्रक्रियेतील घराणेशाहीसारख्या अनिष्ट प्रथांचेही उच्चाटन केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ७१ हजार जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

‘सबका साथ, सबका विकास’ या उमेदीने सुरू झालेला प्रवास विकसित भारतासाठी कार्यरत आहे. आज सिक्कीमचा स्थापना दिवस असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. या ९ वर्षांमध्ये रोजगाराच्या शक्यता लक्षात घेऊन सरकारी धोरणे बनवण्यात आली. आधुनिक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागाला प्रोत्साहन असो किंवा जीवनाच्या मूलभूत गरजांचा विस्तार या क्षेत्रातील उपक्रम असोत भारत सरकारचे प्रत्येक धोरण तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे. गेल्या 9 वर्षांत सरकारने भांडवली खर्च आणि मूलभूत सुविधांवर सुमारे ३४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रकमेमुळे नवीन महामार्ग, नवीन विमानतळे, नवीन रेल्वे मार्ग, पूल इत्यादी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे देशात अनेक नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

तंत्र भारताच्या इतिहासाचा विचार करता आज भारताचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या ७ दशकातील २० हजार किमीच्या तुलनेत गेल्या ९ वर्षात ४० हजार किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा संदर्भ देत, २०१४ पूर्वी केवळ ६००  मीटर मेट्रो मार्ग टाकण्यात आले होते तर आज अंदाजे ६ किमी मेट्रो रेल्वे मार्ग टाकले जात आहेत असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी उद्या तुम्ही महात्मा गांधींनाही इंग्रजांचे सेवक म्हणाल? राजकीय नेते असून अशी बेजबाबदार विधानं कशी करता? - सर्वोच्च न्यायालय

राहुल गांधी उद्या तुम्ही महात्मा गांधींनाही इंग्रजांचे सेवक म्हणाल? राजकीय नेते असून अशी बेजबाबदार विधानं कशी करता? - सर्वोच्च न्यायालय

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते...

मेधा पाटकरांना अटक, २३ वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत!

मेधा पाटकरांना अटक, २३ वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत!

नर्मदा बचाओ आंदोलनातील सहभागामुळे प्रकाशझोतात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने बुधवारी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॅारंट जारी केले होते. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये न्यायलयाने २३ वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात त्यांना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121