त्वचेबद्दल आणि त्वचेशी निगडित प्राकृत (नैसर्गिक) सौंदर्याबद्दल आयुर्वेदामध्ये खूप विस्तृत वर्णन आहे. हल्लीच्या ‘fast life instant results’च्या जमान्यात आयुर्वेदाची औषधे, चिकित्सा प्रणाली सिद्धांत ‘"slow acting’ आहेत, असा बहुतांशी सामान्य जनतेत गैरसमज आहे. मात्र, हे पूर्णत: चुकीचे असून तो केवळ एक भ्रम आहे. तेव्हा, आजच्या भागात त्वचेची काळजी कशी घ्यायची, याविषयी जाणून घेऊया...
कुठल्याही व्याधी जीर्ण स्वरुपाच्या असल्या, मुरलेल्या असल्या, अन्य औषधोपचारांमुळे अंशत: कमी झाल्यासारखा वाटत असल्या, तरी त्या संपूर्णत: समूळ बरा झालेल्या नसतात आणि अशा व्याधींच्या चिकित्सेचा कालावधी नक्कीच अधिक आहे. कारण, आयुर्वेदिक चिकित्सेने व्याधी फक्त बर्या होत नसतात, तर त्याचबरोबर व्याधीचे समूळ उच्चाटनही केले जाते व त्याची पुनरावृत्ती रोखण्याच्या दृष्टीने ‘अपुनर्भव’चिकित्सा ही करता येेते. यामुळे एकदा औषध सुरू झाले की, ते कायमस्वरुपी (आयुष्यभर) घ्यावे लागत नाही. याच सिद्धांतांच्या आधारावर आयुर्वेद सौंदर्यशास्त्रदेखील उत्तम चिकित्सा पद्धतीचा पर्याय होऊ शकतो.
मागील लेखांमधून प्रकृतीनुरुप प्राकृत त्वचा, त्यात होणारे त्रास इत्यादीबद्दल आपण वाचले. आज त्वचेची घ्यावयााची काळजी (general instructions) याबद्दल जाणून घेऊया.
शरीराचे बाह्य आवरण म्हणजे त्वचा. नखशिखांत आपले शरीर त्वचेने आच्छादलेले आहे. डोक्यावरील केस आणि पुरुषांमधील दाढी-मिशा वगळता अन्य भागी त्वचेवर फारसे केस नसतात. त्वचा बाह्य वातावरणातील बदलांना थेट सामोरी जाते. चेहरा, मान आणि हात हे अवयव मुख्यत्वे करून बाह्य वातावरणांशी थेट संपर्कात येतात. बर्याचदा शरीरावर असलेल्या त्वचेची जाडी भिन्नभिन्न असते. जशी-हाता-पायांच्या तळव्यांची त्वचा सगळ्यात जाड असते आणि पापण्या व ओठांची त्वचा सगळ्यात पातळ असते. चेहर्याची त्वचा नाजूक असते आणि प्रथमदर्शनी माणसाचा चेहराच बघितला जातो. म्हणून त्वचेची काळजी घेताना संपूर्ण शरीरावरील त्वचेपेक्षा चेहर्याची त्वचा अधिक जोपासली जाते, जपली जाते. सौंदर्याच्या दृष्टीने त्वचेची काळजी घेताना काही नियम पाळावेत, ते खालीलप्रमाणे.
भारतीयांची त्वचा मुख्यत्वेकरून, गोरा-सावळा व गहू वर्ण या रंगछटांमध्ये बसते. खूप गोरा आणि खूप काळा असा रंग खूप कमी भारतीयांमध्ये आढळतो. याचे कारण म्हणजे, आपल्या त्वचेत असलेले मेलानिन या रंजक घटकाचे प्रमाण. भारतीय त्वचेमध्ये मेलानिनमधील र्एीाशश्ररपळपचे प्रमाण अधिक असल्याने वरीलप्रमाणे आपले वर्ण/रंग असतात. र्एीाशश्ररपळपची सूर्यतापापासून त्वचेचे संरक्षण करण्याची क्षमता अधिक उत्तम असते. म्हणजेच भारतीय त्वचा युव्ही किरणांपासून नैसर्गिकरित्या अधिक चांगल्या पद्धतीने संरक्षित राहते. पाश्चात्यांच्या त्वचेप्रमाणे पांढरे घटक नसल्याने ‘सनबाथिंग’ची गरज भारतीय त्वचेला नाही आणि जर सूर्याप्रकाशात अधिक काळ जरी राहिले तरी केवळ त्वचा टॅन होते. पण, ‘सनबर्न्स’ होत नाहीत. (याला सततचा प्रखर सूर्याचा संपर्क हा अपवाद होऊ शकतो.) म्हणजेच काय, तर पाश्चात्यांच्या त्वचेला सूर्याच्या घातक किरणांपासून जेवढे जपावे लागते, तसे भारतीय त्वचेला लागत नाही. कारण, करणाने जसे कवच धारण केले होते, तसेच र्एीाशश्ररपळप रूपी कवच नैसगिकरित्या भारतीयांना लाभले आहे. पण, हल्ली तापमान वाढू लागले आहे. अशा वेळेस त्वचा झाकावी, सुरक्षित ठेवावी. ते कसे? तर हलक्या रंगाचे सूतीचे, पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत. (कॉटन, लिनेन) इ. नैसर्गिक सूताचे कपडे वापरावेत. नायलॉनचा वापर टाळावा. तसेच, डोक्यावर टोपी स्कार्फ/छत्री इ. काहीतरी घ्यावे आणि सगळ्यात महत्त्वाचे शक्य असल्यास दुपारी 12 ते 4चे ऊन टाळावे. या कालावधीत उन्हात जाऊ नये.
सनस्क्रिन विविध स्वरुपात उपलब्ध आहेत. लोशन, जेल इ. SPF (åhUOo SUN PROTECTINE FACTOR) जेवढा जास्त, तेवढे ते चांगले सनस्क्रिन असे मानला जाते. सनस्क्रिन जे ऑईल-बेस्ड असतात, त्यांचा त्वचेवर काम करण्याचा कालावधी जलीय सनस्क्रिनपेक्षा जास्त असतो. पण, ऑईल-बेस्ड सनस्क्रिनमुळे त्वचेतील रंध्रे बंद राहतात आणि त्वचेतील स्निग्धांश, स्वेद इ. आतच अडकून पडतो. मग त्वचेवर कंड येणे, खाज येणे, पूरळ येणे, त्यात पूनिर्मिती होणे इ. तक्रारी सुरू होतात. ज्यांची त्वचा आधीच खूप तेलकट व घामट आहे, त्यांना वरील त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. सनस्क्रिन लावण्याचा अजून एक तोटा म्हणजे, ते दर तीन ते चार तासाने लावावे लागते. (कारण, त्याची कार्यकारिता तेवढ्याच कालावधीसाठी असते) त्यानंतर पुन्हा लावताना, जरा घराबाहेर असू, तर चेहर्यावर चिकटलेले धुळीचे कण, घामाचा अंश इ. सगळे सनस्क्रिनच्या आत अडकले जातात व पूरळ येण्याचे प्रमाण खूप जास्त होते.
‘सनब्लॉक’ हे सनस्क्रिनपेक्षा अधिक दाट तैलीय असते. गाडीच्या काचेवर ज्याप्रमाणे एक कोटेड फिल्म लावल्याने आत संपूर्ण सूर्यप्रकाश शिरत नाही, तसेच काहीसे कार्य या सनब्लॉकचे आहे. पण, हे कार्य घडताना, त्वचेवरील रोमरंध्र (PORES) देखील बंद (BLOCK) होतात आणि वारंवार वापरल्यावर कालांतराने त्वचा काळवंडलेली, डागाळलेली आणि निस्तेज दिसू लागते. सनस्क्रिन आणि सनब्लॉक क्रीम ऑईल-बेस्ड असल्याने केवळ पाण्याचे धुवून ते संपूर्ण निघत नाही. त्याला साबण, फेसवॉश इ. लावावे लागते. जर विविध साबणांचा वापर अधिक केला गेला, तर त्वचा कोरडी होऊ लागते आणि काळवंडलेली, खरखरीत निस्तेज व कंडयुक्त होते.
भारतीय त्वचेला फक्त सुती कपडे, सनकोट आच्छादन (छत्री/टोपी/स्कार्फ इ.) असले तरी पुरेसे आहे. पण, विविध त्वचा उपचार (जसे- केमिकल पील्स, लेझर ट्रिटमेंट, फेअरनेस क्रीम, इ.) मुळे त्वचेवरील सर्वात बाहेरील मृत पेशींचा स्तर काढला जातो. या स्तराचा सगळ्यात मोठा फायदा बाह्य वातावरणातील तीव्र गोष्टींपासून त्वचेचे संरक्षण करणे, हे आहे. वरील त्वचा उपचार विविध तीव्रतेनुसारही त्वचा व अन्य स्तरांपर्यंत ओरबाडून, खेचून काढल्या जातात. त्वचा उजळ दिसते, पण त्याची संरक्षण करण्याची क्षमता कमी होते, खंडीत होते. या उपचार पद्धती वारंवार अवलंबल्यास त्वचा नाजूक होते. संवेदनशील होते. त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा त्वचेसाठी मग सनस्क्रिनचा वापर करावा लागतो.त्वचेची नैसर्गिक क्षमता जर वाढवायची असली, तर नस्य (नाकात औषधी तेल /तुपाचे थेंब घालणे) व कवल/गण्डूष धारण (Oil Pulling) करणे हे नित्य करावे. याचबरोबर अभ्यंग रोज करावा. (क्रमश:)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)