मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित " धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाला प्रदर्शित होउन दि. १३ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेते प्रसाद ओक यांनी जनतेचे आभार मानले. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. यानिमित्ताने प्रसाद ओकने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून "धर्मवीर" चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसाद येणाऱ्या नव्या भागालासुध्दाला मिळावा अशी आशा प्रसाद ओक यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी "धर्मवीर" च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील रसिकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल जनतेचे आभार मानले. चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतीस अभिवादन करत मुख्यमंत्र्यांनी रसिकांचे आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
"दिघे साहेब, असेच आमच्या पाठीशी राहा" अशी भावनिक साद अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी घातली. तसेच त्यांनी पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई यांचेदेखील आभार त्यांनी मानले. दरम्यान हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारलेला होता. त्यांची राजकीय कारकीर्द या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर दाखविली गेली.