मुंबई : 'द केरला स्टोरीला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादाने महाराष्ट्रात चित्रपट सृष्टीतील वातावरण तापले आहे. काही लोक द केरळ स्टोरी चित्रपटाला असलेले आपले समर्थन सांगत आहेत तर काही गट महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने केरळ स्टोरी पहिला नसल्याचे सांगत केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे कौतुक केले आहे.
अमृता खानविलकर म्हणाली, "मी लंडन येथे आहे, इथे द केरळ स्टोरी चित्रपट मी अजूनही पहिला नाही. परंतु महाराष्ट्र शाहीर चित्रपट पहिला नि प्रमोट केला."
एका वापरकर्त्याने समाज माध्यमांवर ; मराठी चित्रपट सृष्टी द केरळ स्टोरी चित्रपटाला का प्रमोट करत नाही असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अमृता असे म्हणाली आहे. आपले उत्तर देऊन झाल्यावर अमृताने पुन्हा वापरकर्त्याला प्रतिप्रश्न केला आहे. अमृताने आपल्याउत्तरानंतर विचारले आहे, "मी तर चित्रपट पहिला पण तुम्ही सुद्धा पहिला का?
दोनही चित्रपट गेल्या एका आठवड्यात प्रदर्शित झाले. महाराष्ट्र शाहीर हा मराठी भाषेतील चित्रपट आहे तर केरळ स्टोरी हा सुदिप्तो सेन या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला चित्रपट ५ भाषांत प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र्र शाहीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४च दिवसांनी केरळ स्टोरी चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. केरळ स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. दरम्यान महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहिरांच्या प्रमोशनसाठी याचना केली होती. त्यानंतर हा सर्व सावळा गोंधळ समाज माध्यमांवर सुरु आहे.