सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन-आयुर्वेदासंगे

    01-May-2023
Total Views | 278
beauty

आपण या लेखमालिकेतून विविध प्रकृती आणि त्याच्या गुणदोषांची माहिती करुन घेत आहोत. आजच्या लेखातून कफ प्रकृतीच्या व्यक्तीची प्राकृतिक त्वचा कशी असते आणि कफ प्रकृतीमध्ये होणारे संभाव्य त्वचा विकृती याबद्दल जाणून घेऊयात.

कफ हे त्रिदोषांपैकी एक मूल तत्व आहे. (वात, पित्त आणि कफ हे तिन्ही शरीराच्या व मनाच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि विनाशाला मुख्यतः कारणीभूत आहेत.) या त्रिदोषांच्या सुस्थितीवर आरोग्य आणि त्यांच्या दुष्टी/विकृतीवर अनारोग्य-अस्वास्थ्य अवलंबून असते. प्राकृत दोषांची शरीरातील विविध कार्ये या आधी आपण विविध लेखांमधून या सदरात वाचलीच आहेत. हे तिन्ही दोष, धातू (सप्त धातू रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र) व मल (मल, मूत्र, स्वेद इ.) यांच्या आश्रयाने कार्य करतात. म्हणजेच शरीरावर इष्ट-अनिष्ट परिणाम जे होतात, ते या त्रिदोषांमुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे धातू व मलातील बिघाडावरून कळते.

कफाचे मुख्यतः कार्य धारण करणे, जोडणे, आकार देणे, टिकवून ठेवणे, स्थिरता देणे, पोषण पुरविणे इ. आहेत. ही कार्ये शरीरातील प्रत्येक अवयवात कफामुळे सातत्याने घडत असतात. कफामुळे शरीरात आतून-बाहेरून एक प्रकारचा स्निग्धांश/स्नेहांश मिळतो. यामुळे घर्षण, संघर्ष कमी होऊन शरीराच्या विविध अंग-अवयवांची झीज रोखण्यास मदत होते. शरीराचे व मनाचे बळ उत्तम राखण्यासही कफ दोषच कारणीभूत आहे. प्रतिकारशक्ती वाढविणे, आपल्या इंद्रियांचे सामर्थ्य बळ उत्तम राखणे, हेदेखील कफाच्या स्नेहन या गुणामुळे उत्तम घडते. कर्मेंद्रिय - हात, पाय, वाक् (वाणी), गुद आणि उपस्थ म्हणजेच motor organs आणि मन अशी एकूण ११ इंद्रिये आयुर्वेदाने सांगितली आहेत. शरीराला, विविध सांध्यांना स्थिरता देणे, जखम झाल्यास मार लागल्यास त्या अवयवाला लवकर सुव्यवस्थित स्थितीत आणणे, शरीरातील झीज भरुन काढणे, शरीराला पोषित व पुष्ट करणे आणि शरीर व मनाचे बळ आणि सामर्थ्य वाढविणे. सहनशीलता व क्षमता वाढविणे इ. कार्ये प्राकृत कफाची आहेत.

कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कफाचे प्राबल्य विशेषत्वाने अधिक असते आणि हे प्राबल्य प्राकृत कफाचे आहे, विकृत कफाचे नाही. म्हणजे, उत्तम प्रतीच्या कफदोषाचे प्राबल्य कफज प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये असते आणि याचा चांगला परिणाम शरीराच्या व मनाच्या, बुद्धीच्या विविध आयामांवर होताना दिसतो.

कफ प्रकृतीच्या व्यक्तीची त्वचा मऊ, मुलायम असते. वर्ण बहुतांशी वेळा गोरा असतो. शरीर बांधेसूद धष्टपुष्ट, गोंडस व सुदृढ असते. त्वचा (well nourished, well hydrated) दिसते. त्वचेवर एक तुकतुकी असते. त्वचा पोषित असते आणि पोत उत्तम असतो. लागले-खरचटले तरी लवकर जखम बरी होते, भरून येते. उन्हापासून सूर्यतापापासून त्वचेला लगेच त्रास होत नाही. त्वचेची क्षमता व प्रतिकारशक्ती अन्य दोन्ही दोषांमधल्या प्रकृतीपेक्षा अधिक चांगली असते. त्वचेची चिरकारिता उत्तम असते.

म्हणून, त्वचेवर तिळ-मस लवकर उत्पन्न होत नाहीत. प्रखर सूर्यतापाचा त्वचेवर अनिष्ट परिणाम होत नाही अथवा अत्यल्प प्रमाणात होतो. त्वचेवर सुरकुत्याही लवकर उत्पन्न होत नाही. (लहान बाळाचा जसा मऊ-मुलायम गुबगुबीत चेहरा असतो, अशा सारखा चेहरा काहीसा कफ प्रकृतीमध्ये आढळतो.) कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा 'Aging signs ’च्या खूप जवळ आहे. म्हणजे त्वचेचा पोत एकसंग असणे वर्ण एकसंग असणे (Even texture) उत्तम वर्ण असणे (Deep Seated) आणि त्वचा स्थिर(Firm & without open pores) असणे हे फक्त मुख प्रदेशी असलेल्या त्वचेबद्दल नाही, तर सर्वांगीण त्वचेबद्दल ही अपेक्षित आहे.

आतापर्यंत प्राकृतिक व कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा आपण बघितली. कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जर विकृती/वैधर्म आले, तर ते कसे असते. विकृती सहसा होत नाही आणि झालीच तर ती चिरकाल टिकते. उदा. जर गळू, तारुण्यपिटीका फोड, जखम इ. जर काही झाले, तर ते खूप खोल (Deep Seated) होते आणि त्यात काठिण्य (कडकपणा) बहुतांशी वेळेस असतो. तसेच जखम आतल्या आत वाढते. सुरुवातीस वेदना, लालीमा इ. जाणवत नाही. पण, हळूहळू त्याची तीव्रता वाढू लागते आणि नंतर गळू/फोड/मुखदूषिका फुटल्यावर ही जखम खोल असल्याने भरून येण्यास थोडा वेळ लागतो. जखम लवकर सुकत नाही, त्यातून चिवटस्त्राव अधिक काळ वाहत राहतो आणि काही वेळेस याचे वळ डाग राहतात, पूर्ण जात नाहीत.

कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जर स्थौल्य, प्रमेह विविध त्वकरोग इ. जर झाले, तर त्यांना संपूर्ण बरं करणे थोडे अधिक कष्टाचे होते. स्थौल्य आणि प्रमेह, मधुमेहामुळेदेखील त्वचेच्या विविध तक्रारी उत्पन्न होतात आणि त्यांना बरे करणे चटकन होत नाही. तसेच, त्या तक्रारी वारंवार उत्पन्न होण्याचे प्रमाणही अधिक असते. मुख त्वचेबद्दल विशेष बघायचे झाले, तर यांचा घाम अधिक चिकट असतो व तारुण्यपिटीका या (Cystic Acne किंवा Nodcular Acneच्या) वर्गातील असतात. मुखदूषिका (ACNE) मध्ये बीजयुक्त तारुण्यपिटीका असणे हे कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये विशेषत्वाने आढळते. त्वकरोग जे होतात, ते स्रावी (oozing) प्रकाराचे प्रामुख्याने असतात. जसे. oozing eczema इ.

आतापर्यंत एकल प्रकृती व त्यांच्या त्वचेबद्दल आपण विस्तृतपणे जाणून घेतले. पण, एकल प्रकृतीपेक्षा द्वंद्व (combimation) प्रकृती अधिक बघायला मिळते. म्हणजे, जसे वातज-पित्तज प्रकृती, वात-कफज प्रकृती आणि पित्त-कफज प्रकृती. यात ही दोन्हीपैकी एका दोषाचे प्राबल्य दुसर्‍या दोषांपेक्षा अधिक असते व ज्याचे अधिक असते, ते आधी संबोधिले जाते. जसे वात-पित्तजमध्ये वाताचे प्राबल्य पित्ताच्या प्राबल्यापेक्षा अधिक असते व ज्याचे अधिक असते, ते आधी संबोधिले जाते. जसे वात-पित्तजमध्ये वाताचे प्राबल्य पित्ताच्या प्राबल्यापेक्षा अधिक असते. या उलट, पित्त-वातजमध्ये पित्ताचे प्राबल्य वाताच्या प्राबल्यापेक्षा अधिक असते आणि प्राबल्यातही तरतमता असते.

म्हणजे केवळ वात-पित्तज प्रकृतीच्या व्यक्ती जरी असल्या तरी त्यात तरतमता असते. विविध रंगछटा जशा एका रंगाच्या दिसतात, तशाच रंगछटा प्रत्येक प्रकृतीत, विशेषत: द्वंद्वज प्रकृतीमध्ये आढळतात आणि ज्या दोषाचे प्राबल्य अधिक, त्याचे गुण त्या व्यक्तींमध्ये अधिक अंशात असतात. म्हणून त्वचेतील वैविध्य खूप बघायला मिळते. विविध आकृतीचे, वर्णाचे, मानसिक गुणांचे स्वभावाचे व्यक्ती बघायला मिळतात, त्याचे हेच कारण आहे. compartmentalized classification शक्य नाही. पण, मुख्यत्वे करून तीन भेद आणि असंख्य रंगछटा अशा पद्धतीने प्रकृती आणि व्यक्ती असतात. (क्रमश:)

वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

९८२०२८६४२९


अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121