मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले रामललांचे दर्शन!

    09-Apr-2023
Total Views | 70
eknath-shinde-and-dcm-devendra-fadnavis-at-ayodhya

नवी दिल्ली
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उभयतांनी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबतच खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना समोर आली आहे (handling protected snake). नवी मुंबईतील घणसोली येथे बोगस सर्पमित्रांनी या आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्यासाठी देऊन त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केले (handling protected snake). यासंदर्भात ठाणे वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वन विभागाकडून चौकशी सुरू आहे (handling protected snake). महत्त्वाचे म्हणजे सर्पमित्रांनी आंतरराष्ट्रीय इन्फ्ल..

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या  आठ कार्यकर्त्यांना अटक

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या आठ कार्यकर्त्यांना अटक

नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात आली असे वाटत आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना ..

चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाड्याच्या पुनर्वसनासंदर्भात गुरुवार दि. २० मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत माहिती दिली (kundalpur relocation issue). हे गाव व्याघ्र प्रकल्पामधून वगळण्यासाठी पुढील एक महिन्याच्या आत राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला जाईल, अशी खात्री त्यांनी दिली (kundalpur relocation issue) . तसेच हा प्रश्न गेल्या २८ वर्षांपासून रखडवल्यामुळे वन अधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले. ..