नवनीत राणा 'हिंदू शेरनी'!

अयोध्येत नवनीत राणांचे बॅनर्स

    08-Apr-2023
Total Views |
hoardings-of-mp-navneet-rana-along-with-chief-minister-eknath-shinde-in-ayodhya-uttar-pradesh

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. ८ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. दोन दिवसासाठी त्यांचा हा दौरा आहे. त्यानिमित्त अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच लखनऊ विमानतळापासून ते अयोध्येपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत. पंरतू तरी अयोध्येतील एका बॅनर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे नवनीत राणा यांच्या बॅनर्सने. नवनीत राणा यांचं बॅनर्स अयोध्येत लागलं असून त्यावर 'हिंदू शेरनी' असं लिहण्यात आले आहे.तसेच 'जो प्रभू राम का नहीं ,श्री हनुमान का नहीं ,वह किसी काम का नहीं' असे देखील लिहण्यात आले आहे.
 
अयोध्येच्या रस्त्यावर एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले होते. पंरतू दि. ८ एप्रिल रोजी अयोध्येच्या रस्त्यांवर खासदार नवनीत राणा यांचे मोठे होर्डिंग्ज आणि बॅनरही दिसत आहेत. आणि हे बॅनर्स सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.