अरूणाचल प्रदेशातील किबीथू गावातून व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमास प्रारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित; योजनेसाठी ४८०० कोटींची तर रस्तेबांधणीसाठी २५०० कोटी तरतूद

    08-Apr-2023
Total Views | 92
 Vibrant Villages Programme

नवी दिल्ली
  : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबीथू गावातून 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे, या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने ४८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, यापैकी २५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. 'व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम' या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच लद्दाख या केंद्रशासित प्रदेशातील १९ जिल्ह्यातील ४६ गटांतील २९६७ खेड्यांचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६६२ खेड्यांचा प्राधान्यक्रमाने विकास केला जाईल, यात अरुणाचल प्रदेशातील ४५५ खेड्यांचा समावेश आहे.

'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाची या सीमावर्ती गावांत राहणाऱ्या लोकांचे जीवन उंचवण्यास मदत होईल आणि लोकांना आपापल्या मूळ ठिकाणी राहण्यास प्रोत्साहित करेल, जेणेकरून लोकांचे स्थलांतर थांबेल आणि सीमा सुरक्षित राखण्यातही मदत होईल. या अभियानासाठी जिल्हा प्रशासन, तालुका आणि पंचायत स्तरावर आवश्यक त्या यंत्रणेची मदत देईल, ज्याद्वारे निश्चित केलेल्या गावांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी सुनिश्चित होईल. गावांच्या विकासासाठी जिथे जिथे केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे, अशी क्षेत्रे म्हणजे, रस्ते जोडणी, पिण्याचे पाणी, सौर आणि पवन उर्जेसह वीज, मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पर्यटन केंद्रे, बहुउद्देशीय केंद्रे आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि आरोग्य केंद्रे यांचा विकास या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे.

अरूणाचलमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह १० एप्रिल, २०२३ रोजी किबिथू येथे "सुवर्ण जयंती सीमा प्रकाशमान अभियाना" अंतर्गत बांधण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेश सरकारच्या नऊ सूक्ष्म जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन करतील. तसेच, लिकाबली (अरुणाचल प्रदेश), छपरा (बिहार), नूरनाड (केरळ) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) प्रकल्पांचेही ते उद्घाटन करतील. केंद्रीय गृहमंत्री किबिथू येथे आयटीबीपीच्या जवानांशीही संवाद साधतील.





अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121