नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन सरकारने चीनच्या टिकटॅाक या सोशल अॅपवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल गव्हर्नमेंटने सुरक्षेचे कारण देत टिकटॉकवर बंदी घातली. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या सरकारी उपकरणांवर हे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप चालणार नाही.
या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचा टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या जगातील काही निवडक देशांत समावेश झाला आहे. यापूर्वी अमेरिका, कॅनडा, यूके व न्युझीलँड सरकारने टिकटॉकवर बंदी घातली. अटॉर्नी जनरल मार्क ड्रेफस यांनी गुप्तहेर व सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “आज मी अटॉर्नी जनरल विभागाच्या सचिवांना राष्ट्रकूल विभाग व यंत्रणांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या डिव्हाईसवर टिकटॉक अॅप बंद करण्याचे निर्देश जारी केलेत. या निर्देशांची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल.”