मोठी बातमी! जो बायडन भारतात येणार

    22-Apr-2023
Total Views | 67
joe biden

दिल्ली
: अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे भारत दौऱ्यावर येणार आहे. जो बायडेन यांचा हा दौरा सप्टेंबर महिन्यात असणार आहेत. भारत-अमेरिका परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटल्यानुसार, भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत आहेत, त्यामुळे भारत दौऱ्याकरिता आम्ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव टोनी ब्लिंकन हे देखील त्यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येणार आहेत. हा संपूर्ण दौरा जी-२० परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. भारताकडे जी-२० परिषदेचे अध्यक्षपद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील जी-२० परिषदेत सहभागी होणार आहेत.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121