नशेचा भस्मासुर..!

    21-Apr-2023
Total Views | 59
ncb

एकविसाव्या शतकात बरेचदा प्रत्यक्ष युद्धापेक्षा अप्रत्यक्ष युद्धावरच भर अधिक दिसतो. एकापेक्षा एक सरस अण्वस्त्रे जरी भात्यात असली तरी, एकतर अर्थव्यवस्थेद्वारे स्थानिक बाजारपेठ संपवली जाते अन् दुसरे म्हणजे समोरील देशातील तरुण पिढीला नशेद्वारे बरबाद तरी केले जाते. जगाच्या पाठीवर चालणारी नशेच्या पदार्थांची तस्करी आणि महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या भारतावर याचा होणारादूरगामी परिणाम याची त्यानिमित्ताने चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे.

गेल्या आठवड्यात युरोपमधल्या समृद्ध देश असलेल्या इटलीच्या समुद्रकिनारी दोन हजार किलोपेक्षा अधिक कोकेनचा तरंगता साठा तेथील नौदलाने पकडला. जवळपास७० वॉटरप्रूफ पॅकेटमध्ये ‘सील’ केलेली या कोकेनची किंमत जवळपास तीन हजार कोटींपेक्षाही अधिक. कोकेनचे पॅकेट हे मासे पकडण्याच्या जाळ्यात बांधून समुद्रात फेकण्यात आले होते. त्याचसोबत त्याला ‘लुमिनस ट्रॅकिंग डिव्हाईस’ही बांधले होते, जेणेकरून ते नंतर पुनर्प्राप्त करता येईल.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ते लपवण्यासाठी मालवाहू जहाजातून फेकण्यात आले होते. ते नंतर शोधून ठरवून दिलेल्या ठिकाणी पुरवठा करतील, अशी आशा तस्करांना होती. समुद्रातून अशा प्रकारे नशेचे पदार्थ पकडले जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडने पॅसिफिक महासागरातून साडेतीन हजार किलो कोकेन जप्त केले होते. त्याची किंमत चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. तस्करांना ते ऑस्ट्रेलियात पुरवायचे होते.

जगभरात नशेच्या पदार्थांची मागणी आणि तस्करी वाढत असताना त्यात भारतही मागे नाही. ‘एनसीबी’कडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व त्यात हजारो लोकांना अटकही होते. पण, फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अडकली आहे. या युवाशक्तीच्या बळावर भारत प्रगतीच्या दिशेने मोठी मजल मारू शकतो, असे वारंवार सांगितले जाते. परंतु, देशाच्या याच आघाडीवरच्या मजबूत फळीला अमली पदार्थांसह अन्य व्यसने अक्षरशः कुरतडत आहेत.

‘एनसीबी’ने २०२२मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतात दीड हजार कोटींचा रुपयांच्या फक्त हेरॉईनचा व्यापार झाला होता. यात एमडी, कोकेन, मॉर्फिन, स्मॅक, ब्राऊन शुगर, नशेची इंजेक्शन यांचा व्यापार तर कित्येक हजार कोटींमध्ये असण्याची शक्यता वर्तविली आहे, तर राजरोसपणे चर्चेला जाणार्‍या गांजा, चरस, भांग यांची उलाढालीची तर दुनियाच वेगळी आहे. अहवालानुसार, देशात १४२ ड्रग्ज सिंडिकेट कार्यरत आहेत. या सिंडिकेटचे आफ्रिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आशियातील देशांशी संबंध आहेत.

‘एनसीबी’च्या अंदाजानुसार, दरवर्षी ४०० मेट्रिक टन किरकोळ हेरॉईन आणि सुमारे ५० मेट्रिक टन बल्क हेरॉईनची भारतातील विविध शहरांमध्ये तस्करी केली जाते. आकडेवारीनुसार, दोन दशलक्ष व्यसनी दररोज सुमारे एक हजार किलो उच्च दर्जाच्या हेरॉईनचे सेवन करतात. भारतात पंजाब आणि ईशान्येतील राज्ये अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र आहे. २०२२ मध्ये फक्त पंजाबमधून १६ हजार नागरिकांना अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली होती, तर पूर्ण भारतातअमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत एकूण ७५ हजार नागरिकांना अटक करण्यात आली होती, तर ‘चाईल्ड लाईन इंडिया फाऊंडेशन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार,परिस्थिती एवढी गंभीर आहे की, या परिस्थितीला आत्ताच आटोक्यात आणले नाही, तर संपूर्ण युवा पिढी बरबाद होणार असल्याचे संकेत त्यांनी वर्तविले आहेत.

१९९२ मध्ये ३०० लोकांमधील एकाला दारूचे व्यसन होते, तर २०२१ मध्ये तेच २० पैकी पाचजण दारू पितात. याखेरीजतंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी १२ लाख लोक आपल्या देशातील असतात. वरील सर्व आकडेवारी ही गंभीर असून, कदाचित यापेक्षा अधिक तरुण व्यसनाधीन असू शकतात. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचा मोठा वाटा राहणार आहे. या तरुण पिढीला सोबत घेऊनच महासत्ता भारत होऊ शकतो. या भस्मासुराला रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच कठोर कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य ठरणार आहे.

अमित यादव

अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121