कोईम्बतूर स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

    21-Apr-2023
Total Views | 49
nia

नवी दिल्ली : गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तामिळनाडूतील उक्कडम येथील अरुल्मिगु कोट्टई संगमेश्वरा थिरुकोविल मंदिराजवळ स्फोट झाला होता. जेमशा मुबीन कार चालवत होता ज्यामध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बसवण्यात आले होते. मंदिरासमोर स्फोट होऊन यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

या हल्ल्यातील मुख्य आरोपी जेमशा मुबीन हा इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीपासून प्रेरित होता. या खटल्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावरील आरोप वगळण्यात आले. मात्र, मोहम्मद अश्रुतीन, मोहम्मद थल्हा, फिरोज, मोहम्मद रियास, नवास आणि अफसर खान यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुबीनवर आयएसआयच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. एनआयएने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी तपास हाती घेतला होता. या प्रकरणात, मोहम्मद अस्रुतीनकडून एक पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला होता, ज्यामध्ये मुबीनने स्वतःला दौलत-ए-इस्लामिया (इस्लामिक स्टेट) चा सदस्य म्हणून सादर केले होते.

आरोपपत्रात एनआयएने म्हटले आहे की, मुबीनने हा आत्मघाती हल्ला करण्याचा आपला हेतू असल्याची माहिती दिली होती. मुबीनच्या घरातून हस्तलिखित नोट्सही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकशाहीवर टीका करत हे इस्लामिक कायद्यानुसार नसल्याचे म्हटले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121