ब्रेंकीग न्यूज ; जम्मू- काश्मीरमध्ये ४ जवान हुतात्मा

    20-Apr-2023
Total Views | 127
indian-army-truck-fire-accident-update-jammu-kashmir

नवी दिल्ली
: जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात जवानांच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार जवान हुतात्मा झाले आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


indian-army-truck-fire-accident-update-jammu-kashmir

वीज पडल्याने ट्रकला आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचवेळी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. स्फोट, ग्रेनेड हल्ला आणि वीज पडणे ही आग लागण्याची तीन कारणे समोर आली आहेत, असे लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या आगीत संपुर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पोलीस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे.


ज्या भागात हा अपघात झाला तो भाग पुंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यास मदत केली.




 
अग्रलेख
जरुर वाचा
मोठी बातमी! बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल; सोशल मीडियावर #ArrestViratKohli ट्रेंड

मोठी बातमी! बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल; सोशल मीडियावर #ArrestViratKohli ट्रेंड

(Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या ..

ग्रंथोपासक, समाजभूषण दाजी पणशीकर काळाच्या पडद्याआड!

ग्रंथोपासक, समाजभूषण दाजी पणशीकर काळाच्या पडद्याआड!

रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121