सावरकरांविरोधात एक शब्दही सहन करणार नाही

’सावरकर गौरव यात्रे’त मुख्यमंत्री शिंदे कडाडले

    02-Apr-2023
Total Views | 116
eknath-shinde-on-savarkar-controversy-savarkar-gaurav-yatra


मुंबई
: स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यावतीने रविवारी मुंबई आणि ठाण्यात आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलेत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा वारंवार अवमान करणार्‍यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. सावरकरांच्या गौरव यात्रेतून त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

‘राहुल गांधींनी माफी मागावी’

दादरमध्येही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी.दादरमधील भाजप व शिवसेनेच्या या यात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थिनीही पारंपारिक वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
 
राज्यभरात ६ एप्रिलपर्यंत सावरकर गौरव यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी तसेच राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121