ही फसगत नेहमीचीच!

    19-Apr-2023   
Total Views | 150
 Ajit Pawar political strategy

अजित पवार हे आपल्या नेहमीच फसणार्‍या बंडांमुळे सातत्याने चर्चेत असतात. दर दोन-तीन वर्षांनी नाराजीच्या चर्चा घडवून आणायच्या, आमदार एकत्र करून बंड करत असल्याच्या बातम्या स्वतःच पेरायच्या आणि अखेरीस काका शरद पवारांनी सुनावल्यावर सपशेल माघार घ्यायची, हा शिरस्ता अजित पवार गेली अनेक वर्षे पाळत आहेत. अजित पवारांनी आजवर केलेल्या बंडाचा विचार करता उच्च पदाची महत्त्वाकांक्षा आणि पक्षावर एकहाती पकड करण्याची सुप्त इच्छा या दोन बाबी बंडामागे दिसतात. मात्र, त्यापलीकडेही सुप्रिया सुळेंच्या हाती पक्षाची धुरा जाऊ नये आणि काकांनंतर बहिणीच्या हाताखाली काम करायला लागू नये, ही त्या मागील खरी कारणे आहेत. अजितदादांनी केलेली बंड फसली. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसवर आजही शरद पवारांच्या एकहाती आणि भक्कम नेतृत्वाचे गारुड कायम आहे. पक्षाची स्थापना होऊन २४ वर्षे उलटून गेली तरी आजही पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पवारांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी आजही ‘कनेक्ट’ कायम आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी आणि गावकर्‍यांशी असलेला थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण असल्याने शरद पवारांविषयी आमदारांमध्ये एक आपुलकीची भावना आहे. कुठलीही गोष्ट ‘लॉजिकल एंड’वर संपवण्याचा शरद पवारांचा गुण अजित पवारांमध्ये नाही, हेच अजितदादांच्या फसगतीचे मुख्य कारण. बंड केल्यानंतर आपण ही कृती करण्यामागे नेमकी कारणे काय आणि बंडानंतर आपल्या समर्थक आमदारांचे काय करणार, याबाबत स्पष्टता करण्यात अजितदादा कमी पडतात आणि त्यामुळे दादांची बंड फसतात, असे स्वतः राष्ट्रवादीचे आमदार खासगीत बोलतात. मुळातच अजितदादांच्या बाबतीत प्रतिमारंजन करून त्यांना वास्तवापेक्षा अधिक मोठे दाखवण्यात आले. त्यातच अजितदादांच्या भाटांनी ‘दादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस’ असे भासवण्याचा प्रयत्न केला. पण, दिल्लीत राहूनही शरद पवारांनी पक्षावरील आपली मजबूत पकड सैल होऊ दिलेली नाही, ज्याचा प्रत्यय २०१९ साली झालेल्या आणि परवा फसलेल्या बंडानंतर पुन्हा दिसून आला. अजितदादांची धरसोड वृत्ती, एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे राजकीय अस्तित्व हा पेच, भाजपत जायचं की नाही यावरून निर्माण झालेला संभ्रम आणि पक्षांतर्गत निर्माण झालेली कोंडी, या सगळ्या धुमश्चक्रीत गोंधळलेल्या अजितदादांची कायम फसगतच झाली, जी त्यांच्या आक्रमक राजकीय नेतृत्व या प्रतिमेला तडा देऊन गेली!
ही तर सुरुवातच!

अजित पवारांच्या फसलेल्या तिसर्‍या बंडावेळी राज्यात इतरही काही राजकीय घडामोडी घडल्या. भाजपकडून राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असून, अजित पवार यांना फोडून भाजपला त्यांचे अभियान यशस्वी करायचे आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केला होता. यावर बंडाची सांगता झाल्यावर माध्यमांसमोर आलेल्या अजित पवारांनी स्वतः खुलासा करत “इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी आमचे वकीलपत्र घेऊ नये आणि आमची बाजू मांडू नये,” असे म्हणत राऊतांना चांगलेच फटकारले. त्यावरून संजय राऊत यांनीही स्पष्टीकरण देत ’‘मी ‘ऑपरेशन लोटस’विषयी लिहिले ते योग्यच आहे. मी जे लिहिले ते सत्य असून, जर कुणाला त्याचा त्रास होत असेल, तर त्याला मी काहीही करू शकत नाही. शरद पवार यांनी जर माझ्याविषयी प्रश्न उपस्थित केले, तर त्याकडे मी गांभीर्याने पाहीन आणि मी केवळ त्यांचेच ऐकेन,” या शब्दांत राऊतांनीदेखील अजितदादांना प्रत्युत्तर दिले. मुळातच जेव्हा तीन भिन्न प्रकृती आणि विकृतीचे पक्ष एकत्र येतात, तेव्हा अशाप्रकारचे वाद निर्माण होणे स्वाभाविकच. ‘मी फक्त पवारांचे ऐकेन’ या राऊतांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत नेमकं कुणी कुणाचं ऐकायचं?


ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..