पाकिस्तानात का होतायत चिनी कंपन्यांवर हल्ले?

कराचीतील उद्योग बंद; द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट

    18-Apr-2023
Total Views | 38
Chinese businesses face closure in Pakistan

कराची : पाकिस्तानी नागरिकांकडून चीनी कंपन्या आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तेथील कंपन्यांनी आवराआवर सुरू केली आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट निर्माण झाले असून त्याचा आर्थिक फटका चीनला बसत आहे.
 
पाकिस्तानच्या कराची पोलिसांनी चिनी नागरिकांचे काही उद्योग बंद केलेत. यात एक उपहारगृह, एक सुपरमार्केट व मरीन-प्रॉडक्ट कंपनीचा समावेश आहे. चिनी नागरिकांवरील संभाव्य हल्ल्यांच्या भीतीपोटी हे पाऊल उचलण्यात आले आहे. चिनी नागरिकांवरील हल्ल्यांमुळे द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट येऊ शकते, अशी पाकला भीती आहे.

दरम्यान, पाकिस्तानी नागरिकांत चीन विरोधी भावना बळकट होत आहे. आर्थिक मदत, नवे व्यवसाय व मायनिंग ऑपरेशन्सच्या नावाखाली चीन आपल्या जमिनी बळकावत असल्याचा त्यांना संशय आहे. पाकिस्तानात सक्रिय अतिरेकी संघटनाही चिनी नागरिक व चीन-पाक आर्थिक कॉरिडोरशी संबंधित प्रकल्पांना लक्ष्य करत आहेत. त्याचा संपुर्ण फटका चीनला बसत असून, त्यांनी केलेली गुंतवणूक संकटात सापडली आहे.

कर्जमाफीसाठी पाकचा चीनवर दबाव

दरम्यान, पाकिस्तान कर्जमाफीसाठी चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने कर्जमाफी दिली नाही, तर तो डिफॉल्ट घोषित होऊ शकतो, अशी पाकला भीती आहे. चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र लष्करी तुकडीला वित्तपुरवठा करण्यासाठी पाककडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही आर्थिक कोंडी झाली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121