रत्नागिरी : सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार, दि. १५ एप्रिल रोजी भव्य स्वरुपात हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. दहा हजारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या संतप्त हिंदु बांधवांनी या वेळी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
श्रीराम शिवतीर्थ मारुती मंदिरापासून स्वातंत्र्य लक्ष्मी चौकापर्यंत आयोजित या मोर्चामध्ये रत्नागिरीतील बांधवांनी आपल्या विविध न्याय हक्क मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. तब्बल तीन तास शहरातील प्रमुख रस्त्यांतून मार्गक्रमण करीत या मोर्चाचे स्वातंत्र्य लक्ष्मी चौकात सभेत रुपांतर झाले. या सभेला प्रमुख वक्ता म्हणून दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी, हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई, सनातनचे पदाधिकरारी विनय पानवलकर लाभले होते. या तिघांनी रत्नागिरीची सामाजिक स्थिती, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद याबद्दल आपले प्रखर विचार मांडले.
योगिता साळवी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात लव्ह जिहाद, रत्नागिरीतील शासकीय ग्रंथालयाच्या आवारात अतिक्रमण करून मजार बांधली त्या संदर्भात स्थानिकांमध्ये असलेल्या असंतोषाला वाचा फोडली.योगिता साळवीनी बेकायदा उभारलेल्या मजारीबाबत प्रश्न उपस्थित केला तसेच कोझीकोड एक्सप्रेस मध्ये ३ हिंदूंना पेट्रोल टाकून जाळणारा दिल्ली शाहीन बागेतला शाहरुख सैफी अघोरी कृत्य करून रत्नागिरीमध्ये का लपला, त्याचा पुळकाणघेणारे त्याचे मायबाप येथे कोण आहेत हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षेखाली बनवलेली अंतरधार्मिय विवाह परिवार समन्वय समितीबद्दलही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
लव्ह जिहाद विरोधी कायदा सरकारने त्वरित पारित केला पाहिजे का तुम्हाला काय वाटते? हा प्रश्न विचारल्यावर साळवी यांनी उपस्थितांना विचारल्यावर दहा हजारांपेक्षाही अधिक हिंदूंनी हात वर करून लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा अशी मागणी केली.धनंजय देसाई यांनी हिंदू राष्ट्राची आवश्यकता, मुस्लिम दहशतवाद, ख्रिस्ती धर्मांतर यावर सविस्तर विचार मांडले. विनय पानवलकर यांनी हिंदू राष्ट्राच्या उन्नतीसाठी अध्यात्मिक संस्काराची आवश्यकता विषद केली. यावेळी व्यासपीठावर मान्यवर वक्त्यासोबतच जेशव भट, सुभाष वैद्य हे रत्नागिरीतील मान्यवर उपस्थित होते. ‘हिंदुस्थान हिंदुका, नहीं किसीके बाप का, जय श्रीराम, जयतू जयतु हिंदुराष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणानी परिसर दुमदूमला होता. गजानन करमरकर यांनी या कार्यमक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सुप्रिया सुळे, जितेंद्र, आव्हाड अबू आजमी यांना लव्ह जिहाद माहित नाही पण ज्याची मुलगी लव्ह जिहादची बळी ठरते त्या समाजाला लव्ह जिहादचा राक्षस माहिती आहे.-(योगिता साळवी, उपसंपादक-मुंबई तरुण भारत)