नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार असल्याचे शिक्कामोर्तब जनतेने केले आहे. ‘मार्केट रिसर्च फर्म इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट मॉनिटर’ने जगातील २१ अव्वल देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. त्यात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या सर्वेक्षणात २१ देशांतील लोकांचा त्यांच्या सरकारवर किती विश्वास आहे, हे जाणून घेण्यात आले. या सर्वेक्षणात भारतातील जनतेने त्यांच्या सरकारवर म्हणजेच मोदी सरकारवर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे.
जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले असून, विकसित देशही अनेक समस्यांचा सामना करत आहेत. अशा संकटाच्या काळात पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने विविध प्रश्न हाताळले, त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे.
जगानेही मान्य केले ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’
‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ हे देशातील जनतेने मान्य केले आहे. हा विश्वास केवळ देशातीलच नव्हे, तर इतर अनेक देशांतील जनतेनेही मान्य केल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
या सर्वेक्षणासाठी, फर्मने कॅनडा, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युनायटेड स्टेट्ससह २१ देशांतील लोकांशी बोलले. दरम्यान, बहुतेक देशांमध्ये १६ ते ७४ वयोगटातील लोकांना त्यांच्या सरकारबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले. या सर्वेक्षणात बहुतांश शहरी लोकांनी सहभाग घेतला.
१. एखाद्या संस्थेच्या विश्वासाच्या मुख्य निकषात तिच्या कामकाजाबाबत पारदर्शकता (३३ टक्के), टिकाऊपणा (३३टक्के), जबाबदार वर्तन (२९टक्के) यांचा समावेश होतो. जागतिक नागरिकांसाठी, विश्वासार्हता (३६टक्के), त्याच्या कामकाजाबाबत पारदर्शकता (३५टक्के), आणि जबाबदार वर्तन (३१टक्के) हे सर्वात जास्त महत्त्वाचे घटक होते.
२. सर्वेक्षणानुसार, ५२ टक्के लोकांनी भारत सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच बरोबर आयटी कंपन्या (५७ टक्के), ऊर्जा (५७ टक्के), आणि बँकिंग सेवा (५७ टक्के) सह सर्वात विश्वासार्ह क्षेत्र म्हणून उदयास आले.
इंटरनेटवरील लोक आयटी कंपन्यांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. त्यापाठोपाठ ऊर्जा, बँकिंग, रिटेल, वित्त क्षेत्र, फार्मास्युटिकल्स, पॅकेज्ड वस्तू, तेल आणि वायू कंपन्यांचा क्रमांक लागतो. तथापि, सोशल मीडिया कंपन्या, तेल आणि वायू कंपन्यांवर लोकांचा कमी विश्वास असल्याचा या सर्वेक्षणात उल्लेख करण्यात आला आहे.-अमित अडारकर, सीईओ-इप्सॉस इंडिया