हवामानबदलाचा सामना लोकचळवळीनेच शक्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    15-Apr-2023
Total Views | 38
prime-minister-narendra-modi-order-to-prepare-for-climate-change

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक बँकेच्या ‘मेकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या संकल्पनेशी आपला वैयक्तिक संबंध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि ही एक जागतिक चळवळ बनत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

चाणक्य यांचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी लहान कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ ग्रहासाठी स्वतंत्रपणे केलेली प्रत्येक चांगली कृती क्षुल्लक वाटू शकते. मात्र , जेव्हा जगभरातील अब्जावधी लोक सामूहिक कृती करतात, तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आपल्या ग्रहासाठी योग्य निर्णय घेणार्‍या व्यक्ती आपल्या ग्रहाच्या लढाईत महत्त्वपूर्ण आहेत यावर आमचा विश्वास आहे, आणि हाच मिशन लाइफचा गाभा आहे.” कॉप २७ च्या निष्कर्ष दस्तावेजाच्या प्रस्तावनेत देखील शाश्वत जीवनशैली आणि उपभोग याचा उल्लेख आहे असे त्यांनी नमूद केले. जर लोकांनी हे समजून घेतले की केवळ सरकारच नाही तर ते देखील योगदान देऊ शकतात, तर त्यांची चिंता कृतीत बदलेल असे पंतप्रधान म्हणाले.

“हवामान बदलाचा सामना केवळ कॉन्फरन्स टेबलवरून लढता येणार नाही. प्रत्येक घरातील जेवणाच्या टेबलवरून तो लढावा लागणार आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, जेव्हा एखादी कल्पना चर्चेच्या टेबलवरून जेवणाच्या टेबलवर जाते, तेव्हा ती एक लोकचळवळ बनते. आपल्या आवडी निवडी ग्रहाला व्याप्ती आणि गती प्रदान करण्यास मदत करू शकतात याची प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीला जाणीव करून द्यायची आहे. मिशन लाईफ हे हवामान बदलाविरूद्धच्या लढाईचे लोकशाहीकरण करण्याविषयीचे अभियान आहे. जेव्हा लोकांना जाणीव होईल की दैनंदिन जीवनातील साध्या कृतीमध्ये किती ताकद आहे, तेव्हा त्याचा पर्यावरणावर खूप सकारात्मक परिणाम होईल, असेही पंतप्रधानांनी म्हटले.

जगभरातील देशांना प्रोत्साहन देण्यात जागतिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. एकूण वित्तपुरवठ्यातील हिस्सा म्हणून जागतिक बँक समूहाच्या हवामान विषयक वित्तपुरवठ्यात २६% वरून ३५% पर्यंत वाढ प्रस्तावित असल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की या हवामान विषयक वित्तपुरवठ्याचा भर सामान्यतः पारंपारिक पैलूंवर असतो. “वर्तणुकसंबंधी उपक्रमांसाठी देखील पुरेशा वित्तपुरवठा पद्धती तयार करणे आवश्यक आहे. मिशन लाइफ सारख्या वर्तणुकीशी संबंधित उपक्रमांना जागतिक बँक देत असलेल्या पाठबळाचा व्यापक परिणाम होईल”, असे त्यांनी समारोप करताना सांगितले.






अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121