रश्मी ठाकरे 'त्या' पत्रामुळे अडचणीत येणार? चौकशी होणार?

    11-Apr-2023
Total Views | 232
 
Rashmi Thackeray
 
 
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर १९ बंगल्याचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याचं चौकशीमध्ये अनेक जण आरोपी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी देखील केलेला आहे, त्याच संदर्भात काल रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावाच्या माजी सरपंच प्रसाद मिसाळ यांना ताब्यात घेतले आहे.
 
सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये पत्रात, रश्मी ठाकरेनी ग्रामपंचायत कोर्लई ला 23/5/2019 रोजी कळविले की असेसमेंट क्र. ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५ वरील घर आमच्या नावे करावे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतनी १९ बंगले ठाकरेंचा नावाने केले. ठाकरे सरकारनी ते १९ बंगले 2021/22 मध्ये गायब केले. यापत्रामुळे रश्मी ठाकरेंच्या अडचणी वाढ होणार ? त्यांचीही चौकशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
 
 
 
प्रकरण काय ?
 
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जागा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे, असे सांगितले जाते. या जागेवर कथित १९ बंगले असल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करीत आहेत.
 
या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या प्रयत्न करीत होते. अखेर गुरुवारी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात संगीता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांच्या तक्रारीनुसार फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी करण्यात आली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करीत होते. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दबाव आणून अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रात छेडछाड केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121