आता साहित्य क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव
01-Apr-2023
Total Views | 90
16
मुंबई : संगणकाचा शोध लागून बरीच वर्षे झाली. अनेक सुधारणा झाल्या, सुरुवातीपासूनच गणिती हिशोबात संगणक अचूक आकडे अत्यंत कमी वेळात देतो. पण विचारी मेंदू मात्र संगणकाकडे नव्हता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लागला आणि त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या, चांगल्या वाईट मुद्द्यांना अधोरेखित केले गेले. सूक्ष्म अतिसूक्ष्म कंगोरे वेगळे काढून त्यांचे विश्लेषण केले गेले. आज साहित्य क्षेत्रातही याचा शिरकाव झालाय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्याआधारावर चक्क ३ भारतीय भाषांत एक कविता लिहली गेली आहे.
नुकताच चर्चेत आलेला विषय म्हणजे चाट जिपीटी. ज्याची झलकही न पाहता माध्यमावरून आणि चर्चांतून मानवी बुद्धिमत्ता बेदखल होईल की काय ही भीती वाटू लागली आहे. परंतु एआय ने नुकतीच तीन भाषांमध्ये एक कविता लिहिली आहे.
हिंदी-
जो समझाती हैं हमें जीवन के सच। हमारे मन की सभी संवेदनाओं का परिचय, यही तो है, जो देता है हमें नई पहचान। हिंदी साहित्य पर हमें गर्व है, यही हमारी संस्कृति का आधार है। इससे उजाला मिला हमें,
याचे हिंदी, बंगाली आणि मराठी भाषेतील हायकू पुढील प्रमाणे,
हिंदी : धूप का संघर्ष, अंधेरे के साथ ख़त्म, अमर विरासत।
मराठी : शिताकाळाचा वेडा, उदयाला उजळणारी संध्या । विविधतेचे सुंदर संगम
आज जरी या कवितेत सौंदर्य स्थळे किंवा प्रतिभा दिसत नसली तरी तज्ज्ञांच्या मते ती लवकरच दिसून येईल. २०१० साली एकापेक्षा अनेक भाषा येणाऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. भाषा ही त्या त्या संस्कृतीचे प्रतीक असते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यावर प्रभुत्व मिळवू शकत नाही असा समज होता. २०१० मध्ये प्रथम भाषांतर करण्याची प्रणाली अस्तित्व आली. त्यावेळी शब्दश भाषांतराने विनोदच जास्त झाले. परंतु केवळ १० वर्षात भाषांतराचा दर्जा सुधारला. आज संगणकाच्या आधाराने अनुवाद सुद्धा होतात. या गोष्टीचा अभ्यास केला असता असे दिसून येते की असे नवे शोध कमी काळात आपला जम बसवतात. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे.