मध्य प्रदेश : इंदौरमध्ये धर्मांतरासाठी दबाव निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांना दिलेल्या तक्रारीत ख्रिश्चन धर्मगुरू क्रिस नार्मन बेबर्ताने एका २१ वर्षीय तरुणांला ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी धमकी दिली. दि. ५ मार्च रोजी पीडितेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, क्रिस नार्मन बेबर्तापासून मला संरक्षण द्यावे. तसेच आपल्या जीवितास आणि मालमत्तेला धोका असल्याचे ही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण इंदूरच्या खुदाई पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.
पीडितेचे वडील मानसिक तणावाखाली आहेत. ५ मार्च रोजी आरोपी तक्रारदाराच्या घरी आला आणि हिंदू देवतांना शक्तीहीन असल्याचे वर्णन केले.त्यानंतर त्याने पीडितेला पैसे देण्याचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्विकारण्याचे आमिष दाखवले. तसेच पीडितेने जर ख्रिश्चन धर्म स्विकारला तर पीडितेच्या वडिलांवर बडोद्यातील चांगल्या रुग्णालयात उपचार केले जातील. त्याचबरोबर पीडितेला चांगल्या शिक्षणासोबतच नोकरीचे ही आश्वासन देण्यात आले.मात्र पीडितेने स्वत:ला स्वाभिमानी हिंदू म्हणवून घेत कठोर परिश्रम करून आपला उदरनिर्वाह करण्याचे उत्तर दिले.
पंरतू क्रिस नार्मनने “तू जोपर्यंत हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारतो तोपर्यंत तुझे वडील मानसिक तणावाखाली राहतील. संपूर्ण कुटुंब रोगाने वेदनांनी मरेल. ख्रिश्चन झाल्यानंतरच देव पीडितेचा सर्व त्रास संपवतो, असेही क्रिस नार्मन म्हणाला असा आरोप पीडित तरूणाने केला आहे. या संपुर्ण प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि आरोपी क्रिस नॉर्मनला ताब्यात घेतले. तसेच मध्य प्रदेश स्वातंत्र्य कायदा २०२१ च्या कलम ५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.