भारतीय नौदलाने घेतली ‘एमआरएसएएम’ची यशस्वी चाचणी

    07-Mar-2023
Total Views | 61
Indian Navy successfully test-fired MRSAM

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएस) यशस्वी चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान ‘एमआरएसएएम’ने अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा भेद केला.

एमआरएसएएमचे उत्पादन पूर्णपणे भारता झाले असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिआरडीओ) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीतर्फे (आयएआय) बीडीएल हैदराबाद येथे संयुक्तपणे विकसित करण्यात आले आहे.

एमआरएसएएम सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता ते नौदलाच्याही ताफ्यास समाविष्ट करण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी हवेत ३६० अंश फिरून अनेक लक्ष्यांवर किंवा शत्रूंवर हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र ७० किलोमीटरच्या परिघात येणारे कोणतेही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, पाळत ठेवणारी विमाने आणि हवाई शत्रूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. यामध्ये शत्रूची अचूक माहिती मिळण्यासाठी कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, रडार सिस्टीम, मोबाईल लॉन्चर सिस्टीम, अॅडव्हान्स्ड लाँग रेंज रडार, रिलोडर व्हेईकल आणि फील्ड सर्व्हिस व्हेईकल आदींचा समावेश करण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121