नवी दिल्ली : १९९६ च्या विश्वचषकातील चॅम्पियन आणि २००७ आणि २०११ च्या उपविजेत्या श्रीलंकेच्या संघाला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे.हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात, श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत २ सामने जिंकून न्यूझीलंडने मालिका जिकंली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत सर्व विकेट गमावून १५७ धावाच करू शकला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३२.५ षटकांत ४ गडी गमावून १५९ धावा केल्या. आणि न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका जिंकली.