मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावद्दल उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी यांनी राहुल गांधी यांना सुनावलेले खडे बोल म्हणजे फिक्सिंग मॅच होती, अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतेय. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तुमचा जुगार सुरु ठेवा. आमची भुमिका स्पष्ट आहे."
"वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. या विषयावर मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे. मालेगावात झालेल्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रात तुमचंच जे मॅच फिक्सिंग चाललंय, जो जुगार सुरु आहे, तो चालू ठेवा." असं राऊत यांनी म्हणाले.
"सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. ज्या प्रकारे त्यांनी देशासाठी शिक्षा भोगली आहे. जेलमध्ये जाऊन आले आहेत. आता ती व्यक्ती जिवंत नाही. सावरकर जिवंत असते तर आपलं म्हणणं मांडू शकले असते. अशा व्यक्तीवर चिखलफेक केल्यास महाराष्ट्रातील जनता करारा जवाब देऊ शकते. तुमच्या सगळ्याच लढायात आम्ही सोबत असू पण सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. सावरकरांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही बोललो. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे. राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा करेन."
नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करा, कोणत्या कंपनीकडून ठाकरे यांनी किती पैसे घेतले, हे समोर येईल, असं वक्तव्य केलंय. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला ते असं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय."